पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय प्रग कार्यालयांतर्गत कार्यरत असलेला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तथा अतिक्रमण विरोधी विभागाचा बीट निरीक्षक उमेश अरुण लोंढे (वय २८, रा. शिवराजनगर, रहाटणी) याला ७० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. पिंपळे गुरव येथील एका इमारतीवर अतिक्रमण विरोधी कारवाई न करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. या धक्कादायक प्रकरणानंतर पालिकेकडून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
एक ५८ वर्षीय तक्रारदार यांची पिंपळे गुरव परिसरात एक गुंठा जागा असून, त्यांनी त्यावर तीन मजली इमारत बांधली आहे. मात्र, या बांधकामाला महानगरपालिकेची रीतसर परवानगी घेतलेली नव्हती. या बेकायदेशीर बांधकामाविरोधात पालिकेने नोटीस जारी केल्यानंतर तक्रारदाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने तक्रारदाराला पालिकेकडे नियमानुसार दंड भरून हे बांधकाम नियमित करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तक्रारदाराने पालिकेकडे रीतसर अर्जही सादर केला होता.
उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली:
असे असतानाही, पिंपळे गुरव वॉर्डचे बीट निरीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या उमेश लोंढे याने तक्रारदाराला बोलावून घेऊन हे तीन मजली बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत ते पाडावे लागेल अशी भीती घातली. तक्रारदाराने त्याला उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत दाखवली, परंतु लोंढेने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. या इमारतीवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तोडकामाची कोणतीही कारवाई न करण्यासाठी त्याने थेट ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
वाहनतळात सापळा रचून रंगेहाथ अटक:
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली. त्यानुसार पथकाने गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास 'ड' क्षेत्रीय कार्यालयाच्या वाहनतळामध्ये (पार्किंग) सापळा रचला. तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना उमेश लोंढेला एसीबीने रंगेहाथ दरोडा टाकून पकडले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उच्च शिक्षण आणि अवघ्या ३ महिन्यांत नोकरी गमावली:
आरोपी उमेश लोंढे हा बी.ई. सिव्हिल (स्थापत्य अभियांत्रिकी) शिक्षित आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे लाड-पागे समितीच्या माध्यमातून अनुकंपा तत्त्वावर अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच तो महापालिकेच्या सेवेत रुजू झाला होता. शासकीय सेवेत येताच काही दिवसांतच भ्रष्टाचाराचा मार्ग पत्करल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कठोर कारवाई करण्यात आली असून त्याचे संपूर्ण करिअर आता धोक्यात आले आहे.
शहर
- पुणे: विद्यापीठात बोगस डिग्रीचा मोठा घोटाळा उघड! ३ लाखांत विकली जात होती बीकॉमची पदवी
- पुणे: नवले पुलाजवळ १ कोटींची रोकड लुटण्याच्या प्रकरणात तोतया पत्रकार जेरबंद, महिला पोलीस कर्मचाऱ्यासह दोघे जण सहआरोपी
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
महाराष्ट्र
- पुणे: विद्यापीठात बोगस डिग्रीचा मोठा घोटाळा उघड! ३ लाखांत विकली जात होती बीकॉमची पदवी
- पुणे: नवले पुलाजवळ १ कोटींची रोकड लुटण्याच्या प्रकरणात तोतया पत्रकार जेरबंद, महिला पोलीस कर्मचाऱ्यासह दोघे जण सहआरोपी
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
गुन्हा
- पुणे: विद्यापीठात बोगस डिग्रीचा मोठा घोटाळा उघड! ३ लाखांत विकली जात होती बीकॉमची पदवी
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य























Subscribe to my channel



