
Mumbai Dam : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांचे वर्षभराच्या पाण्याचे टेन्शन पूर्णपणे मिटलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं १०० टक्के भरली आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आणि धरणं ओव्हर फ्लो झाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पुन्हा पावसाने जोर धरला आहे. सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे देखील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन जलसाठा १०० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणीप्रश्न मिटला आहे. कोणत्या धरणांमध्ये सध्या किती टक्के पाणीसाठा आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
मुंबई महानगर पालिकेने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा १०० टक्क्यांजवळ पोहचला आहे. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १४,३९,२७१ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९९.४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १४,३३,१४१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच मागच्यावर्षी ९९.०२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा जास्त झाला आहे.
|
Maharashtra Politics: 'चिंगम' राऊतांनी 'सिंघम' फडणवीसांची चिंता करू नये, भाजप नेता भडकला |
मुंबई शहर आणि उपनगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलावांचा समावेश आहे. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या अडीच महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. या धरणातील पाणीसाठा ९९.४४ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या धरणक्षेत्रात परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढत चालला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरववठा केला जातो.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -
- अप्पर वैतरणा - ९९.७९ टक्के पाणीसाठा
- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.
- तानसा - ९९.५८ टक्के पाणीसाठा.
- मध्य वैतरणा - ९८.७९ टक्के पाणीसाठा
- भातसा - ९९.३५ टक्के पाणीसाठा.
- विहार - १०० टक्के पाणीसाठा.
- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



