
Mumbai : एमएचटी सीईटीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी गट) या गटाची परीक्षेला ९ एप्रिलपासून सुरुवात होत असून, यासाठी अर्ज भरलेल्या ३ लाख १ हजार ७३ विद्यार्थ्यांपैकी ९६.३२ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे. तसेच ३.६८ टक्के विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वैद्यकीय आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीसीबी गटाची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यंदा पीसीबी गटासाठी राज्यभरातून ३ लाख १ हजार ७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात १ लाख ७५ हजार ३११ विद्यार्थिनी असून १ लाख २५ हजार ७५१ विद्यार्थी आहेत. तसेच ११ तृतीयपंथीय विद्यार्थी आहेत.
या विद्यार्थ्यांना गुरुवारीपासून ऑनलाईन लॉगीन आयडीमध्ये प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार ३ लाख १ हजार ३७ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ८९ हजार २८६ म्हणजेच ९६.३२ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे. तर ९ हजार २९ म्हणजेच ३ टक्क विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असून, तर २ हजार ५८ म्हणजे ०.६८ टक्के विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे.
|
|
मात्र पहिल्या पसंतीचे केंद्र हे विद्यार्थी राहत असलेल्या जिल्ह्यातील असून, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र हे अन्य जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस अगोदर परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणी जाऊन राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व विद्यार्थिंनींना पहिल्या पसंतीचे केंद्र
पीसीबी परीक्षेसाठी ११ हजार ८७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असले तरी या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व १ लाख ७५ हजार ३११ विद्यार्थिंनींना पहिल्या पसंतीचे केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी मुलींना दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करावा लागू नये याची काळजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेतल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या ११ तृतीयपंथींयापैकी १० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे केंद्र देण्यात आले आहे.
सामाईक प्रवेश परीक्षा ही संगणक आधारित असल्याने जिल्हानिहाय केंद्रे तयार करावी लागतात. प्रत्येक तालुक्यामध्ये पुरेशी केंद्र उपलब्ध करणे शक्य नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रांसंदर्भात अन्य पर्याय भरून घेतले जातात. मात्र विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचेच केंद्र मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




