Mumbai  : वाहतुकीचे नियम पायदळी, ५५ रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा

Mumbai  : वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात देवनार पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी काही रिक्षा चालकांविरोधात गुन्हाही दाखल केला असून पोलिसांनी आठ रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून गोवंडी – शिवाजी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक अवैध वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले होते. रिक्षामधून तीन प्रवाशांना घेऊन जाण्यास परवानगी आहे. असे असताना चालक पाच ते सहा प्रवाशांना रिक्षातून घेऊन जात होते. यामुळे अपघात होण्याच्या शक्यतेमुळे काही नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन देवनार पोलीस, वडाळा परिवहन विभाग आणि मानखुर्द वाहतूक विभाग यांनी संयुक्तरित्या गुरुवारी गोवंडी परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाई सुरू केली होती.

Mumbai : दिवाळीनिमित्त घरात केलेली साफसफाई पडली महागात, कशी ते वाचा आणि सावध व्हा



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *