मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्यातील राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा अनिवार्य केल्यामुळे नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. "महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी हिंदी शिकावी असे सरकारला का वाटते? पडद्याआडून हिंदी लादण्याचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू," असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध करत, परीक्षा रद्द न केल्यास केंद्राबाहेर 'राडा' होईल, असा इशारा सरकारला दिला आहे.
"दिल्लीतल्या भैय्यांना खुश करण्याचा प्रयत्न"
संदीप देशपांडे यांनी सरकारवर बोचरी टीका करताना म्हटले की, "महाराष्ट्रात राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी मराठीतूनच संवाद साधला पाहिजे. अधिकाऱ्यांनी हिंदी शिकून त्यांच्याशी हिंदीत बोलावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. दिल्लीत बसलेल्या भैय्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारकडून हा आटापिटा सुरू आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, राज्यातील अधिकाऱ्यांना उत्तर प्रदेश किंवा बिहारला पाठवणार आहात का, अशी विचारणाही त्यांनी केली.
२८ जूनच्या परीक्षेला विरोध
राज्य सरकारने येत्या २८ जून रोजी ही हिंदी भाषेची परीक्षा आयोजित केली आहे. यासाठी २० मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. यावर आक्षेप घेत देशपांडे म्हणाले की, "एककीडे आपण मराठी भाषेच्या संवर्धनाच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर हिंदीची सक्ती करतो, हा दुटप्पीपणा आहे. ही परीक्षा अधिकाऱ्यांवर लादली जात असून, हा हिंदी भाषेचा प्रसार करण्याचा घाट घातला जात आहे."
"अजेंडा यशस्वी होऊ देणार नाही"
राज्यात जाणीवपूर्वक हिंदी भाषेचे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. "भाजपचा 'हिंदी, हिंदू, हिंदुस्थान' हा जो अजेंडा आहे, त्याचाच हा एक भाग आहे. पण आम्ही हे महाराष्ट्रात यशस्वी होऊ देणार नाही. जर २८ जूनला ही परीक्षा झाली, तर परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या गोंधळाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल," असेही देशपांडे यांनी निक्षून सांगितले.
शहर
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीतही मोठी जबाबदारी; कोणताही निधी मिळणार नाही, पण विशेष शालेय स्वच्छता मोहीम राबविण्याचे शासनाचे निर्देश!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- महाराष्ट्र: दसऱ्यानंतर शिंदेंच्या मंत्रिमंडळात मोठी खांदेपालट! अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन तरुण आमदारांना मिळणार मंत्रिपद!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!



























Subscribe to my channel




