चिपळूण: जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना चिपळूण मंडळाचे मंडल अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी येथील पथकाने बुधवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी सापळा रचून ताब्यात घेतले. मुंबई-गोवा महामार्गावर पाग नाका, पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलजवळ ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी मौजे चिपळूण येथील भूमापन क्रमांक १७४/१अ ही जागा खरेदी केली आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या पत्नीचे नाव दाखल होऊन फेरफार नोंद मंजूर व्हावी, यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार ११ जून २०२६ रोजी फेरफार नोंद करण्यात आली होती. मात्र, ८ जुलै रोजी मंडल अधिकारी उमेश राजेशिक यांनी सदर नोंद रद्द केली.
तक्रारदार यांनी २ ऑगस्ट रोजी राजेशिर्के यांची भेट घेतली असता, रद्द झालेली फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी मोबाइलवर संपर्क साधून फेरफार मंजूर केल्याचे सांगत पुन्हा १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. २७ ऑगस्ट रोजीही फेरफार नोंद मंजूर केल्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची मागणी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याबाबत तक्रारदार यांनी २ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात लेखी तक्रार दिली. त्यानंतर दीपक लॉजसमोर, भोगाळे, चिपळूण येथे पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत मंडल अधिकाऱ्यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाग नाका, पॉवर हाऊस परिसरात सापळा रचण्यात आला.
यावेळी मंडल अधिकारी राजेशिर्के हे तक्रारदार यांच्या वाहनात आले आणि पंचांसमक्ष १० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सायंकाळी ६:०५ वाजता त्यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मच्छिद्र जाधव, पोलिस निरीक्षक सुहास रोकडे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




