मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची सुरक्षितता, उच्च गुणवत्ता आणि आरोग्याची मानके काटेकोरपणे सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईत मोठी धडक तपासणी मोहीम राबवली आहे. या कठोर मोहिमेदरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन, गंभीर स्वच्छता त्रुटी आणि अन्न साठवणुकीतील मोठ्या अनियमितता आढळल्यामुळे मुंबईतील तब्बल १० प्रमुख खाद्य आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली आहेत.
प्रसिद्ध 'सुलेमान मिठाईवाला'च्या परवान्यावर टाच दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोड येथील अत्यंत प्रसिद्ध आणि जवळपास ९० वर्षे जुने प्रतिष्ठित मिठाईचे दुकान असलेल्या ‘सुलेमान उस्मान मिठाईवाला’ (Suleman Usman Mithaiwala) यांच्या खाद्य परवान्यावर प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान या दुकानात अन्न तयार करण्याची जागा आणि कचरा साठवण्याची किंवा सांडपाण्याची ठिकाणे यामध्ये योग्य ते अंतर किंवा अलगाव (Inadequate separation) नसल्याचे उघडकीस आले. तसेच उघड्या नाल्यांवर कॉकरोच ट्रॅप्स नसणे, मिठाई अयोग्य तापमानावर आणि अस्वच्छ वातावरणात साठवणे यांसारख्या गंभीर त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याचे स्पष्ट झाल्याने अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (FSS Act) ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
इतर प्रमुख आस्थापनांवरही कठोर प्रशासकीय कारवाई फक्त सुलेमान मिठाईवालाच नव्हे, तर मुंबईतील इतरही अनेक नामवंत हॉटेल्स, स्वीट मार्ट्स, रेस्टॉरंट्स आणि डार्क स्टोअर्सवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
-
बॅलार्ड इस्टेट येथील स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart Dark Store): येथे तपासणीदरम्यान अन्न हाताळणी क्षेत्रात जिवंत उंदीर (Live rat), कुडतडलेले तांदळाचे पोती, उंदराची विष्ठा, खाद्यपदार्थांवर कॉकरोच आणि रेफ्रिजरेटर युनिट्समध्ये घाण व कीटक आढळल्याने तात्काळ परवाना निलंबित करण्यात आला.
-
मालाड पूर्वेकडील सद्गुरू स्वीट्स अँड फरसाण मार्ट: येथे तयार मिठाईवर माशा घुटमळत असल्याचे, तसेच उत्पादन व विक्री क्षेत्रात योग्य अलगाव नसून खरेदीचे रेकॉर्ड आणि प्रयोगशाळा अहवाल उपलब्ध नसल्याचे आढळले.
-
याशिवाय इतरही काही नामांकित खाणावळी, हॉटेल्स आणि डेअरींवर प्रशासनाकडून दंडात्मक व निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा धडाका अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या राज्यव्यापी आणि कठोर मोहिमेमुळे संपूर्ण अन्न व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त किंवा अस्वच्छ अन्नाची विक्री करणाऱ्यांवर कसलीही दयेची भावना न दाखवता कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे हॉटेल्स आणि मिठाई व्यावसायिकांचे धाबे दाणणले असून स्वच्छतेच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



