
Maharashtra : शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केले. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढवावी असे वक्तव्य शरद पवार यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिकिया दिली आहे. 'लोकांना वेड्यात जमा करण्याचे काम ते करत आहेत. आधी बोलले असते तर मार्ग तरी लागला असता.', अशा शब्दात जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे यांनी बोलताना सांगितले की, 'मराठा समाजासाठी कोणी काय मागणी केली, काय नाही केली यापेक्षा आधी मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षणामध्ये घ्यावे. त्यानंतर तुम्हाला मर्यादा १०० टक्के का १५० टक्के वाढवायची आहे तेवढी वाढवा. त्याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाही. मराठा समाज हा ओबीसी आरक्षात २७ टक्क्यांच्या आत आगोदर आला असेल. मराठ्यांना आधी ओबीसी आरक्षणामध्ये घेतले पाहिजे त्यानंतर मर्यादा वाढवली पाहिजे. ही सर्व बहाणेबाजी आहे. कुठे तरी समाजाला फसवायचे, त्याची दिशाभूल करायची, मराठ्यांना मार्ग वेगळा दाखवायचा, सहानुभूती दाखवायची. पण हा प्रकार असा नाही. तुम्हाला आधी आरक्षण द्यावे लागेल. त्यानंतर मर्यादा वाढवायची की नाही हे तुमचं तुम्ही नंतर ठरवा.'
|
|
जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, 'उगाच आशेला नका लावू लोकांना. आम्ही मर्यादा वाढवतोय आणि आरक्षणात घालतोय ही आशा आम्हाला नकोय. आधी आम्हाला आरक्षणात घाला. चॉकलेट दाखवणे बंद करा. सत्ताधारी असो किंवा महाविकास आघाडी सर्वच मराठ्यांकडून फायदा करून घेत आहेत. आधी आम्हाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये घ्या. पण नादी लावू नका. निवडणुका होईपर्यंत किंवा मराठ्यांचा फायदा करून घेईपर्यंत विरोधी पक्षाने पण आणि सत्ताधाऱ्यांनी हा नवीन डाव आणलेला दिसतोय.'
तसंच, 'जनतेला खूश करण्यासाठी हे सर्व शब्द वापरू नका. ५० टक्क्यांची मर्यादा वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षणात घ्या नंतर मर्यादा वाढवू. यामुळे मराठा समाज खूश होणार नाही. तुम्ही जनतेला वेड्यात जमा करण्याचे काम करत आहे. इथून मागे बैठका झाल्या तेव्हा विषय काढायचे ना. आता निवडणुकीच्या तोंडावर विषय काढून लोकांना काय नादी लावताय. महायुती असो महाविकास आघाडी असो हे दोन्ही एकच आहे. हा त्यांचा डाव आहेत. ते फक्त लोकांना वेड्यात काढतात. आता बोलले मर्यादा वाढव्याचा मुद्दा. ५० टक्क्यांच्या आत मराठ्यांना घ्या असे आधी म्हणाले असते तर मार्ग लागला असता. आता आचारसंहिता लागू होईल. महाविकास आघाडी आणि महायुती यांना मराठा समाजाला खेळवत ठेवायचे आहे.', असं म्हणत जरांगे पाटील यांनी पवारांवर टीका केली.
शहर
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
महाराष्ट्र
- मुंबई: ठाणे जिल्ह्यातही सार्वजनिक उत्सवांमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी घाला; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आक्रमक मागणी
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कथित भ्रष्टाचार; सभापतींच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
- बीड: शासनाने १२ मागण्या मान्य केल्यावरही मुंबई मोर्चाचा अट्टहास का? ज्योती मेटे यांचे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल
- कोल्हापूर: गुंतवणुकीच्या परताव्याचे आमिष दाखवून अडीच कोटींची फसवणूक; कोकणातील कसाल-गिम्वी येथून तीन जणांना बेड्या
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा






























Subscribe to my channel



