Crime News : तिकीट एजंट बनला विदेशी स्कॉचचा तस्कर; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, तिघेजण ताब्यात

Kalyan : तिकिटांचे व्यवहार करणारा एजंट चक्क दिल्लीहून परराज्यातून उच्च प्रतीचे विदेशी स्कॉचची तस्करी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. या एजंटच्या डायमंड हॉलीडेज ऑफिसवर कल्याण उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत हि कारवाई केली असून या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीनुसार उल्हासनगरमधील डायमंड हॉलीडेज या कार्यालयात विमान आणि रेल्वे तिकिटांचे व्यवहार एजंट मार्फत करण्यात येत होते. अरुणकुमार रामचंद्र पोपटानी असे या एजंटचे नाव असून तो विदेशी दारूची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहीतीच्या आधारे कल्याण राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने त्याच्या उल्हासनगरमधील कार्यालयात छापा टाकला.

Dog Bite Case : शेजाऱ्याला चावला कुत्रा, मालकाला ४ महिन्याचा तुरुंगवास

तीन ठिकाणी टाकण्यात आले छापे

छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. त्यानंतर पोपटानीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या राहत्या घरात, इमारतीच्या पंप हाऊस आणि अंबरनाथमधील आणेगाव येथे छापे टाकण्यात आले. याठिकाणी त्याचे साथीदार सुरज श्रीकौशल शुक्ला व दिपक राजकुमार नंनकानी सुद्धा मोठ्या प्रमाणात विदेशी दारू साठवून ठेवत होते. या तिन्ही ठिकाणांहून एकूण ३५२ स्कॉचच्या सिलबंद बाटल्या विविध ब्रॅन्ड्ससह जप्त करण्यात आल्या.

तिघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल

दरम्यान या कारवाईत स्कॉचच्या बाटल्यांसह दोन वाहने असा एकूण १८ लाख ६३ हजार ४४९ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर आरोपींविरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब आणि त्यांच्या चमूने केली. या तिघांनाही न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Crime News : तिकीट एजंट बनला विदेशी स्कॉचचा तस्कर; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, तिघेजण ताब्यात”

  1. I’ve been exploring for a little bit for any high-quality
    articles or weblog posts in this sort of area . Exploring in Yahoo I ultimately stumbled upon this website.
    Reading this info So i am happy to exhibit that I have an incredibly
    just right uncanny feeling I came upon exactly what I needed.
    I most certainly will make sure to don?t forget this site and provides
    it a look on a constant basis. xnxx

    My website: web page (Ingeborg)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *