हिंजवडी: देशाची आयटी राजधानी म्हणून ओळख असलेल्या हिंजवडी आणि माण परिसरात पावसाळा जवळ आला की पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही केवळ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे करण्याऐवजी प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी आक्रमक मागणी आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नेमकी समस्या काय?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणे ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरते. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप येते, ज्यामुळे वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ होते. अपूर्ण राहिलेली नालेसफाई, खड्डेमय रस्ते आणि नियोजनाचा अभाव यामुळे आयटीयन्सना तासनतास वाहतुकीत अडकून राहावे लागते. दरवर्षी या समस्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून केवळ 'पाहणी' करण्याचे सोपस्कार पार पाडले जातात.
आयटीयन्सचा संताप:
"पावसाळा सुरू व्हायला काहीच दिवस उरले आहेत. दरवेळी अधिकारी येतात, फोटो काढतात आणि आश्वासने देऊन जातात. पण प्रत्यक्षात रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. आम्हाला मेट्रोच्या कामामुळे आधीच त्रास होत आहे, त्यात पावसाळ्यातील पाणी तुंबण्याची भर पडली तर हिंजवडीतून बाहेर पडणे अशक्य होईल," अशा भावना एका आयटी कर्मचाऱ्याने व्यक्त केल्या.
प्रशासनापुढील आव्हाने:
माण-हिंजवडी परिसरात पीएमआरडीए (PMRDA), एमआयडीसी (MIDC) आणि स्थानिक ग्रामपंचायत अशा विविध यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव दिसून येतो. नालेसफाईची कामे अद्यापही अनेक ठिकाणी रेंगाळली आहेत. मेट्रोच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेड्समुळे रस्ते आधीच अरुंद झाले आहेत, त्यात पाणी साचल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
नागरिकांची मागणी:
१. पाणी साचणाऱ्या सखल भागांत तातडीने ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी.
२. रखडलेली नालेसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी.
३. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ते सुस्थितीत करावेत.
४. सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र येऊन ठोस कृती आराखडा राबवावा.
हिंजवडीचे 'वॉटर पार्क' होऊ नये, अशी कळकळीची विनंती आता येथील करदात्या नागरिकांनी केली आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार की पुन्हा एकदा केवळ आश्वासनांचे गाजर मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
महाराष्ट्र
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- कोल्हापूर: बीआयआर कायद्याचा अध्यादेश मागे घ्या! कोल्हापुरात हजारो साखर कामगारांचा विराट मोर्चा; २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा
- सोलापूर: १६ वर्षांचा संसार मोडल्याने पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले चक्क गाढविणीशी लग्न
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!

























Subscribe to my channel



