ईशा योग केंद्रातील महाशिवरात्री उत्सवात सद्गुरू व भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘भव्य भारत भूषण पुरस्कार’ सुरू करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर अध्यात्मिक वारसा आणि राष्ट्रीय संरक्षण यांतील सखोल नातेसंबंध अधोरेखित करत राजनाथ सिंह यांनी रविवारी या सोहळ्यात लाखो साधकांना संबोधित केले. “एकीकडे संकटकाळात आमचे सशस्त्र दल शिवाच्या भावनेने मानवतावादी मदत पुरवतात. तर दुसरीकडे कर्तव्याची हाक आली की ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या मोहिमा रुद्राच्या तीव्रतेने पार पाडतात,असे ते म्हणाले. आमच्या सैनिकांमधील ही भावना आपल्या संस्कृतीतून, भगवान शिवांच्या प्रेरणेतून येते.” असंही त्यांनी नमूद केलं. “येथील दैवी अनुभूती मला कोणी सांगितल्याविना जाणवते की हे स्थान महादेवांच्या कृपेने पावन झाले आहे.” असं राजनाथ सिंह त्या रात्रीच्या दिव्य ऊर्जेने भारावून म्हणाले.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री श्री एल. मुरुगन, पुदुच्चेरीचे गृहमंत्री श्री ए. नमस्सिवायम, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच पर्यटन राज्यमंत्री श्री सुरेश गोपी आणि तामिळनाडू विधानसभेचे सदस्य श्री एस. वेलुमणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आध्यात्मिक उत्सवात ग्लॅमरचीही भर पडली. सारा अर्जुन, तनिषा, तमन्ना भाटिया, जुही चावला, सलीम मर्चंट, मौनी रॉय आणि वेंकटेश प्रसाद यांसारख्या सेलिब्रिटींनी ईशा योग केंद्रातील ३२व्या महाशिवरात्री उत्सवात लाखो भाविकांसह सहभाग घेतला. “शंभो”च्या घोषात आणि “गंगा” या थीमवर आधारित या उत्सवात पवित्र गंगेचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्यात आले. संगीत, ध्यान आणि शिवकृपेच्या अखंड अनुभूतीत लाखो लोक प्रत्यक्ष आणि ऑनलाइन सहभागी झाले.
“आदियोगी भविष्याचे आहेत”: सद्गुरू
योगी आणि तत्त्वज्ञ सद्गुरूंनी आदियोगींच्या शाश्वत महत्त्वाबद्दल बोलताना सांगितले, “आदियोगी भूतकाळातील नाहीत; ते भविष्याचे आहेत. कारण त्यांनी दिलेले हे कोणतेही श्रद्धासमूह, तत्त्वज्ञान किंवा विचारसरणी नाही, तर ते मानवकल्याणासाठीची तंत्रे आहेत.” पुढील एक-दोन दशकांत “मानवकल्याणासाठीची तंत्रे जागतिक पातळीवर प्रभावी शक्ती बनावीत. वर पाहू नका, आत पाहा. आतच मार्ग आहे,” असे ते म्हणाले.
भव्य भारताचे शिल्पकारांचा सन्मान
यंदाच्या महाशिवरात्रीत प्रथमच ‘भव्य भारत भूषण’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रांत राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करणाऱ्या असामान्य व्यक्तींचा गौरव करण्यासाठी सद्गुरूंनी हा उपक्रम सुरू केला. “राष्ट्र म्हणजे फक्त जमीन नाही; राष्ट्र म्हणजे त्याची माणसं. माणसं प्रेरित आणि कटिबद्ध असतील तरच आपण भव्य भारत घडवू शकतो,” असे त्यांनी सांगितले.
यावर्षी सात मान्यवरांचा गौरव करण्यात आला : विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात श्री नांबी नारायण आणि श्री किरण कुमार; नृत्य क्षेत्रात सौ. अलार्मेल वल्ली; संगीत क्षेत्रात सौ. एन. राजम; इतिहास व संस्कृती क्षेत्रात श्री विक्रम संपत; क्रीडा क्षेत्रात सौ. सायना नेहवाल; तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मधील सेवेसाठी भारतीय सशस्त्र दलांचे प्रतिनिधी – एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (वायुसेना), लेफ्टनंट जनरल ए.व्ही.एस. राठी (सेना) आणि व्हाइस अॅडमिरल आर.व्ही. गोखले (नौदल) यांचा त्यात समावेश होता.
योगेश्वर लिंग महाअभिषेक : ऐतिहासिक अर्पण
प्रथमच सद्गुरूंनी ‘योगेश्वर लिंग महाअभिषेक’ ही गहन आध्यात्मिक प्रक्रिया केली, ज्यामुळे भाविकांना योगेश्वर लिंगाशी आपला संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळाली. जगभरातील पाच दशलक्षांहून अधिक लोकांनी या मोफत उपक्रमासाठी नोंदणी केली, ज्यामुळे हा ईशाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जागतिक सहभाग ठरला.
संगीत, ध्यान आणि महामंत्राची रात्र
सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालील ध्यानसत्रे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदित्य गढवी, प्रशांत सोनग्रा, स्वरूप खान, ब्लेझ, हरीश सगाणे, ढोल ताशा पथक, स्वागत राठोड, पृथ्वी गंधर्व, ऐश्वर्या आणि दीपाली तसेच ‘साउंड्स ऑफ ईशा’ या बँडच्या सादरीकरणांनी वातावरण आनंदमय आणि शांततेने भरले. आंतरराष्ट्रीय कलाकार स्झा यांनीही आपल्या कुटुंबासह थोडा नृत्यसहभाग घेतला आणि ईशा योग केंद्रातील ‘सम्यमा’ या आठ दिवसीय मौन साधनेच्या अनुभवाबद्दल सांगितले. मध्यरात्रीच्या ठोक्याला महामंत्राच्या घोषाने संपूर्ण योग केंद्र एकात्म भावनेत निनादले. तसेच रात्रभर भव्य अन्नदानाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये हजारो भाविक आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
महाशिवरात्री २०२६ सोहळ्याचे २५ भाषांमध्ये (श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी सांकेतिक भाषेसह) थेट प्रक्षेपण करण्यात आले. २०० हून अधिक दूरदर्शन वाहिन्या आणि डिजिटल माध्यमांद्वारे अंदाजे १५० दशलक्ष प्रेक्षकांपर्यंत हा उत्सव पोहोचला. यामुळे हा जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक आध्यात्मिक कार्यक्रमांपैकी एक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. यावेळी सद्गुरूंनी इनर इंजिनिअरिंग’ हा मोफत ऑनलाइन कार्यक्रम जाहीर केला. तो 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्वांसाठी उपलब्ध असेल.
कालभैरव प्रतिष्ठापना
याच प्रसंगी सद्गुरूंनी यावर्षाअखेरीस ईशा योग केंद्रात ‘कालभैरव’ प्रतिष्ठापना होणार असल्याची घोषणा केली, जो ईशाच्या आध्यात्मिक प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाचाही महाशिवरात्री उत्सव अध्यात्म, उत्साह आणि संस्कृती यांचा सुंदर संगम ठरला.
[embedded content]
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



