पुणे: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजप आमदार, आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. निवडणुकांच्या कामात आणि मतदार नोंदणीत अपेक्षित गांभीर्य न दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच, "उद्या माझ्याकडे पदे मागण्यासाठी आलात, तर सर्वात आधी तुमचे 'रिपोर्ट कार्ड' काढीन, तुम्ही पक्षासाठी नेमके काय काम केले हे तपासेन आणि त्यानंतरच पुढचा विचार करीन," असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह संपूर्ण जिल्ह्यात पक्षाची सत्ता असतानाही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेली मतदार नोंदणी आणि तयारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचा मुद्दा बैठकीत गाजला. कोकणात जर ८० टक्क्यांपर्यंत मतदान होऊ शकते, तर पुण्यात असा उत्साह का दिसत नाही? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ पक्षाच्या जीवावर निवडून यायचे आणि स्वतःच्याच कामांना प्राधान्य द्यायचे, ही भूमिका चालणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी नेत्यांना फटकारले.
बैठकीतील ठळक मुद्दे आणि मुख्यमंत्र्यांचा संताप
-
प्राधान्य स्वतःला की पक्षाला?: "तुम्ही सगळे नेते झाला आहात आणि मोठ्या पदांची स्वप्ने पाहता, मात्र पक्षाची वेळ आल्यावर तुमचे प्राधान्यक्रम बदलतात. पक्षाच्या पाठबळावर निवडून आल्यानंतर पक्षासाठी आणि विजयासाठी मेहनत घेणे हे प्रत्येक पदाधिकाऱ्याचे कर्तव्य आहे," असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
-
प्रत्यक्ष सहभागावर भर: शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान आणि मतदार नोंदणी मोहिमेत अनेक स्थानिक नगरसेवकांनी पाठ फिरविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. केवळ कागदावर काम दाखवून चालणार नाही, तर प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोहोचून जुळवून आणण्याचे निर्देश त्यांनी दिले.
-
भविष्यातील पदांसाठी निकष: आगामी काळात ज्यांना पदे किंवा जबाबदाऱ्या हव्या आहेत, त्यांनी आधी आपल्या कामाचा आणि पक्षासाठी घेतलेल्या मेहनतीचा अहवाल (रिपोर्ट कार्ड) दाखवावा लागेल, असा थेट इशारा दिल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजप वर्तुळात सध्या मोठी चलबिचल पाहायला मिळत आहे.
शहर
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समर्थनासाठी मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार!
- अहिल्यानगर: लाखोंचा गल्ला...! प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाचे छापे; रात्रभर सुरु होती चौकशी...
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
महाराष्ट्र
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समर्थनासाठी मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार!
- अहिल्यानगर: लाखोंचा गल्ला...! प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाचे छापे; रात्रभर सुरु होती चौकशी...
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




