पुणे: यंदाच्या हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात उत्तर ध्रुवीय प्रदेश (आर्क्टिक) आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशातील (अंटार्क्टिक) बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा उल्लेखनीय रित्या कमी राहिल्याची चिंताजनक नोंद अमेरिकी अवकाश संशोधन संस्था 'नासा' (NASA) ने घेतली आहे. दरवर्षी मार्च आणि सप्टेंबर महिन्यात या ध्रुवीय नोंदी घेतल्या जातात. चालू वर्षी आर्क्टिकच्या उन्हाळ्यात दहाव्या क्रमांकाच्या, तर अंटार्क्टिकच्या हिवाळ्यात तिसऱ्या क्रमांकाच्या नीचांकी बर्फाची नोंद झाल्याचे उघडकीस आले आहे.
'नासा' आणि नॅशनल स्नो अँड आइस डेटा सेंटर (NSIDC) तर्फे १९७८ पासून उपग्रहांच्या साहाय्याने दोन्ही ध्रुवीय प्रदेशांतील बर्फाच्या कमाल आणि किमान विस्ताराचे सातत्यपूर्ण निरीक्षण केले जाते. उत्तर ध्रुवीय प्रदेशातील बर्फाचे प्रमाण उत्तर गोलार्धातील हिवाळ्याच्या अखेरीस, म्हणजेच मार्चमध्ये कमाल पातळीवर पोहोचते, तर उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे तेथील उन्हाळ्याच्या अखेरीस, म्हणजेच सप्टेंबरमध्ये किमान पातळीवर नोंदले जात असते. याउलट, दक्षिण ध्रुवीय प्रदेशात मार्चमध्ये किमान आणि तेथील हिवाळ्याच्या शेवटी, म्हणजेच सप्टेंबरमध्ये कमाल बर्फाची नोंद होत असते.
नासाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, १४ सप्टेंबर रोजी अंटार्क्टिकामध्ये यावर्षीच्या बर्फाचा कमाल विस्तार १७.५९ दशलक्ष वर्ग किलोमीटर इतका नोंदवला गेला. बर्फाचा हा कमाल विस्तार २०२३ या नीचांकी वर्षापेक्षा जरी जास्त असला, तरी दीर्घकालीन कमाल नोंदींच्या तुलनेत हा आतापर्यंतचा तिसऱ्या क्रमांकाचा नीचांकी विस्तार ठरला आहे. दुसरीकडे, आर्क्टिक प्रदेशात १२ सप्टेंबर रोजी बर्फाचा ४.६ दशलक्ष वर्ग किलोमीटर इतका किमान विस्तार नोंदवला गेला. हा विस्तार २००८, २०१० आणि २०२५ या वर्षांतील किमान विस्ताराशी साधर्म्य राखणारा असून, आतापर्यंतचा हा दहाव्या क्रमांकाचा नीचांकी किमान विस्तार ठरला आहे. याशिवाय, यावर्षीच्या मार्चमध्ये आर्क्टिकमध्ये आतापर्यंतच्या नीचांकी कमाल बर्फाच्या विस्ताराची नोंद झाली होती.
ऐतिहासिक निरीक्षण आणि वैज्ञानिक तंत्रज्ञान
दीर्घकालीन नोंदींचा अभ्यास केला तर, १९७९ ते २०१४ या कालावधीत अंटार्क्टिकामधील बर्फाचा विस्तार प्रत्येक दशकात सुमारे एक टक्का या प्रमाणात वाढत गेल्याचे दिसून आले होते. २०१२ ते २०१४ या सलग तीन वर्षांमध्ये तर अंटार्क्टिकामधील बर्फाच्या विस्ताराचे नवे उच्चांक नोंदले गेले होते. मात्र, त्याच वेळी आर्क्टिक प्रदेशातील बर्फाचे प्रमाण झपाट्याने घटल्याचे दिसून आले. २०१५ पासून मात्र अंटार्क्टिकामधील बर्फाचा विस्तार देखील वेगाने घटू लागला आणि २०२३ मध्ये हा विस्तार विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता. ध्रुवीय प्रदेशांतील बर्फाच्या विस्तारामध्ये होणारा हा बदल एखाद्या दीर्घकालीन हवामान बदलाचा भाग आहे का, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने उपग्रहांच्या माध्यमातून यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
ध्रुवीय प्रदेशांतील बर्फाचे अचूक प्रमाण तपासण्यासाठी शास्त्रज्ञ उपग्रहांवर बसवलेल्या प्रगत मायक्रोवेव्ह संवेदकांचा (Microwave Sensors) वापर करतात. हे संवेदक पृथ्वीकडून अवकाशात नैसर्गिकरीत्या उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेच्या नोंदी घेत असतात. समुद्रावरील बर्फ हा पाण्यापेक्षा जास्त ऊर्जा उत्सर्जित करत असल्याने बर्फाचा विस्तार मोजण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते. मायक्रोवेव्ह लहरी ढगांमधून विनाअडथळा प्रवास करू शकत असल्यामुळे बारा महिने आणि कोणत्याही हवामानात बर्फाच्या सातत्यपूर्ण नोंदी घेणे उपग्रहांना शक्य होते. या सततच्या अभ्यासातून हवामान बदलाचे भविष्यातील धोके स्पष्ट होत आहेत.
शहर
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- पुणे: खडकवासला-फुरसुंगी बोगद्यातून २० हजार कोटींची जमीन मोकळी होणार! पाणी बचतीसह वाहतुकीलाही मिळणार मोठी चालना
महाराष्ट्र
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- कोल्हापूर: त्रिपुरारी पहाट! ५१ हजार दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट; बोचऱ्या थंडीतही कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त सहभाग
गुन्हा
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात


























Subscribe to my channel



