आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवारी 12 फेब्रुवारीला श्रीलंकेने ओमानवर मात करत सलग दुसरा विजय मिळवला. इटलीने नेपाळवर 10 विकेट्सने मात करत दणदणीत विजय साकारला. तर दिवसातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाने नामिबियावर 93 धावांनी मात केली. त्यानंतर आता शुक्रवारी 13 फेब्रुवारीला 3 सामन्यांचा थरार रंगणार आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात झिंब्बावे विरुद्ध भिडणार आहे. कॅनडा विरुद्ध यूएई यांच्यात सामना होणार आहे. तर दिवसातील तिसऱ्या अंतिम सामन्यात यूएसएसमोर नेदरलँड्सचं आव्हान असणार आहे. या तिन्ही सामन्यांबाबत जाणून घेऊयात.
झिंबाब्वे पुन्हा ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देणार?
शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात हा सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे या दोघांचा हा या मोहिमेतील दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केलीय. झिंबाब्वेने ओमानला पराभूत केलंय. तर ऑस्ट्रेलियाने 11 फेब्रुवारीला आयर्लंडवर मात केली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया-झिंबाब्वे यांच्यात सलग दुसऱ्या विजयासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिंबाब्वे सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
झिंबाब्वे पुन्हा जिंकणार?
झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला 2007 साली झालेल्या पहिल्याच टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. आतापर्यंत उभयसंघात 3 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत झिंबाब्वे विरुद्ध अद्याप जिंकता आलेलं नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया शुक्रवारी झिंबाब्वेवर मात करत ही प्रतिक्षा संपवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कॅनडा विरुद्ध यूएई
दिवसातील दुसऱ्या सामन्यात कॅनडा विरुद्ध यूएई आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसराच सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे शुक्रवारी विजयाचं खातं कोण उघडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.
यूएसए विरुद्ध नेदरलँड्स
यूएसए विरुद्ध नेदरलँड्स हा शुक्रवारचा तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना असणार आहे. चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियममध्ये या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. नेदरलँड्सने 2 पैकी 1 सामना जिंकलाय. तर 1 सामना गमावला. त्यामुळे नेदरलँड्सकडे हा सामना जिंकून सुपर 4 दावा मजबूत करण्याची संधी आहे. तर यूएसएला दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे यूएसए विजयाचं खातं उघडण्यात यशस्वी ठरणार का? या साठी निकालापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
शहर
- पुणे: रखडलेला रस्ते विकास आणि विस्कळीत पाणीपुरवठा: प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका
- पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय दिला? पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून प्रफुल पटेलांचा सवाल, महायुतीत रंगली चर्चा!
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
महाराष्ट्र
- पुणे: रखडलेला रस्ते विकास आणि विस्कळीत पाणीपुरवठा: प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका
- पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय दिला? पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून प्रफुल पटेलांचा सवाल, महायुतीत रंगली चर्चा!
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!























Subscribe to my channel



