
Pune Vishrantwadi Youth Killed : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यात पुन्हा एकदा हत्येची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून या तरुणाला संपवलं आहे.
पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात काल मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण हत्येची घटना घडली. पूर्वीच्या वादातून १८ वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना विश्रांतवाडीतील कॉमर्स झोन परिसरात रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली. मृत तरुणाचं नाव गौरव गणेश तेलंगी (वय १८, रा. सिंहगड रोड, नवले हॉस्पिटलजवळ) असं आहे.
गोळी लागली नाही म्हणून दगडाने ठेचलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तौफिक शेख आणि त्याच्या साथीदारांनी गौरववर हल्ला केला. सुरुवातीला गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, गोळी लागली नाही. त्यानंतर आरोपींनी कोयता, दगड आणि विटांचा वापर करत गौरववर जोरदार हल्ला चढवला. डोक्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार पूर्वीच्या वादातून घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी पुणे पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, एवढ्या निर्घृण पद्धतीने झालेल्या हत्येमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मध्यरात्री झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुण्यासारख्या शहरामध्ये वाढणारी गुन्हेगारी कमी कधी होणार? सुसंस्कृत शहरामध्ये आपणही सुरक्षित आहोत का? असे प्रश्न आता पुणेकरांच्या मानत निर्माण होत आहेत.
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पुण्यातल्या कात्रज परिसरात घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना सध्या सगळ्यांच्याच मनाला अस्वस्थ करून जातेय. सासरी घरात सुरू असलेल्या सततच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेनं थेट स्वतःलाच पेटवून घेतलं, आणि काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शहर
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
महाराष्ट्र
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




