वर्धा जिल्ह्यातून एक अतिशय दुःखद आणि तितकीच संतापजनक बातमी समोर आली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असलेल्या रायपूर (जंगली) येथील शेतशिवारात बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वाघाने केलेल्या भीषण हल्ल्यात एका शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. भगवानजी धुर्वे (रा. रायपूर जंगली) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली असून, वन विभागाच्या आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.
नेमकी घटना कशी घडली? मृत शेतकरी भगवानजी धुर्वे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामानिमित्त जात असताना किंवा शेतातून परतत असताना, रायपूर जंगली शिवारातील पांदण रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक व प्राणघातक हल्ला चढवला. या भयंकर हल्ल्यात भगवानजी धुर्वे हे गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. या भागात मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असून, यापूर्वीही आमगाव जंगली येथील शेतकरी खोब्रागडे यांच्यावर असाच जीवघेणा हल्ला करत वाघाने त्यांना जागीच संपवले होते. याशिवाय जुलै-ऑगस्ट महिन्यात अस्वलीने एका गुराख्यावर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्यामुळे शेतकर्यांमध्ये आणि ग्रामीण भागात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संतप्त ग्रामस्थांचा अंत्यसंस्कारास नकार आणि मागण्या: गुरुवारी मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-mortem) झाल्यानंतर मृतदेह मूळ गावी आणण्यात आला. परंतु, जोपर्यंत मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाकडून भरीव मदत मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत संतप्त ग्रामस्थ व कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनल्याने मृतदेह पुन्हा रुग्णालयाच्या शवगृहात पाठवावा लागला.
या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी आणि स्थानिक नेत्यांनी मृतकाच्या कुटुंबियांना नोकरी किंवा थेट १ कोटी रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई देण्याची आक्रमक मागणी लावून धरली. प्रशासनाकडून नियमानुसार २५ लाख रुपयांच्या मदतीची तयारी दर्शवली असली, तरी ग्रामस्थ १ कोटी रुपयांच्या मागणीवर ठाम आहेत. स्थानिक खासदार अमर काळे यांनीही घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांच्या भूमीकेला व १ कोटी रुपयांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. या वाढत्या संघर्षामुळे वन विभाग आणि जिल्हा प्रशासनावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मोठी वेळ आली असून, परिसरामध्ये अजूनही तणावाचे वातावरण कायम आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




