नाशिक: मटणानंतर दही खाणे जीवावर बेतले; वृद्ध महिलेचा करुण अंत, पतीची मृत्यूशी झुंज!

नाशिक:  जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री मटणाचे जेवण आणि त्यानंतर दही खाणे एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या जीवावर
बेतले आहे. या घटनेत ६८ वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे ७८ वर्षीय पती शांताराम नानाजी ह्याळीज यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

नेमकं काय घडलं? शनिवारी (दि. २७) रात्री ह्याळीज कुटुंबीयांनी जेवणात मटणाचा बेत आखला होता. मटण खाल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याने दही खाल्ले. जेवणानंतर काही वेळातच दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले. त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती वेगाने खालावली, हे पाहून त्यांच्या मुलाने - आधार ह्याळीज यांनी त्यांना तातडीने नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच द्वारकाबाई ह्याळीज यांनी प्राण सोडले होते, तर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

पतीची प्रकृती चिंताजनक: द्वारकाबाईंचे पती शांताराम ह्याळीज यांच्यावर मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.

तपास सुरू, या घटनेमुळे संपूर्ण आखतवाडे गावात शोककळा पसरली आहे. नेमकी विषबाधा मटणामुळे झाली की दही खाल्यामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्या रात्रीच्या अन्नाचे नमुने जप्त केले आहेत. हे नमुने अधिकृत तपासणी आणि रासायनिक विश्लेषणासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *