
Mumbai : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आयएएनएसने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईमधील राहत्या घरी धर्मेंद्र यांचे निधन जाले. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांनी अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तब्बल ६ दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे. विले पार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अमिताभ बच्चन, आमिर खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकार अंत्यसंस्कारासाठी पोहचले आहेत.
मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये धर्मेंद्र यांच्यावर काही दिवसांपूर्वी उपचार सुरू होते. काही दिवसांपासून श्वसनासंबंधी त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज २४ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी, तसेच सहा मुलं — अभिनेता सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल, अहाना देओल आणि मुली अजीता व विजेता असा परिवार आहे.
६ दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी मागे अपूर्व असे कार्य सोडले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्ण युग संपल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त केली जात आहे. २५ डिसेंबरला प्रदर्शित होणारा ‘इक्कीस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे.
|
|
धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधल्या कपूरथला जिल्ह्यात झाला होता. त्यांचं शिक्षण फगवाडा इथल्या आर्य हायस्कूलमध्ये झालं. धर्मेंद्रंचं शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत झालं होतं. त्यानंतर ते रेल्वेमध्ये क्लर्क म्हणून नोकरीलाही लागले. पण सिनेमाची,अभिनयाची आवड असल्यानं त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांनी फिल्मफेअरच्या स्पर्धेत भाग घेतला अन् त्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं.
१९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या ‘फूल और पत्थर’, ‘यादों की बारात’, ‘मेरा गाँव मेरा देश’, ‘नौकर बिवी का’, ‘बेताब’, ‘घायल’ यांसारख्या अनेक चित्रपटांनी हिंदी सिनेमाला नवे आयाम दिले. २०१२ मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील खेडेगावात धर्मेंद्र केवाल कृष्ण देओल या नावाने जन्मलेल्या या अभिनेत्याने १९ वर्षांचे असताना प्रकाश कौर यांच्याशी विवाह केला. नंतर चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांची ओळख हेमा मालिनी यांच्याशी झाली आणि दोघांनी विवाह केला. वयाच्या उत्तरार्धातही धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रिय होते. नैसर्गिक जीवनशैली, शेती, आरोग्य आणि साध्या जीवनातील आनंदाबद्दल ते चाहत्यांशी शेअर करत असत. ट्रॅक्टर चालवत किंवा शेतात काम करतानाचे त्यांचे व्हिडिओ लोकप्रिय ठरले होते.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




