नवी दिल्ली: 'चलो संसद' मोर्चावर सोमवारी झालेला पोलिसांचा लाठीमार आणि अश्रुधुराच्या कारवाईनंतर मंगळवारी पुन्हा शेकडो विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) समर्थक जंतरमंतरवर तेवढ्याच उत्साहाने परतले आहेत. निःशस्त्र विद्यार्थ्यांवर केलेल्या बळाच्या वापरामुळे सीजेपीचे आंदोलन अधिकच मजबूत झाल्याचे चित्र आहे.
पोलिसांनी सोमवारी सायंकाळी जंतरमंतरवरील तंबू व व्यासपीठ उखडून टाकून उर्वरित विद्यार्थ्यांना हटवले होते. त्यानंतर दीपके यांच्यासह कार्यकर्ते रात्रभर जवळच्याच केरळ हाऊस परिसरात थांबून होते. मात्र, मंगळवारी दिवसाच्या सुरुवातीलाच सीजेपीने पुन्हा जंतरमंतरवरच आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला. समाज माध्यमांवरून हे वृत्त पसरताच विद्यार्थी जंतरमंतरवर जमा होऊ लागले. सकाळी साडेऊनच्या सुमारास आंदोलनस्थळ भरून गेले. पोलिसांनी हटवलेले तंबू पूर्ववत करण्यात आले. ज्या व्यासपीठावर वांगचुक उपोषणाला होते, तिथे आंदोलकांनी ठाण मांडले आहे. एकीकडे या आंदोलनाला पाठिंबा वाढत असताना आता आंदोलकांचे संदेश दिल्ली पोलिसांच्या रडारवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सीजेपीच्या मोर्चाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आंदोलकांमध्ये झालेला कथित संवाद उघडकीस आला आहे. संदेशांतून असे दिसून येते की, इंटरनेट सेवा बंद पडल्यास संपर्क कायम राखण्याची तयारी केली जात होती; तसेच या उद्देशासाठी जीव देण्याची तयारीही दर्शवली जात होती. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तपास अधिकारी त्या 'चॅट्स'ची सत्यता आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पडताळून पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आंदोलकांनी ब्लूटूथ सिग्नल वापरून काम करू शकणाऱ्या काही ॲप्लिकेशन्सचीही सूचना केली होती, असेही तपासात समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांचा खुलासा
सीजेपीने आयोजित केलेल्या 'चलो संसद' मोर्चा रोखल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराचा मारा केला. मात्र, रोखलेल्या आंदोलकांपैकी एकही जण ताब्यात नाही, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीने दावा केला होता. मात्र, नंतर सर्व समर्थकांची सुटका झाल्याचे स्पष्ट करून, सीजेपीने दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयासमोर होणारे आंदोलन मागे घेतले. तत्पूर्वी, सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी 'एक्स'वर पोस्ट करून आरोप केला होता की, पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करून शेकडो लोकांना ताब्यात घेतले आहे आणि वकिलांनाही त्यांची भेट घेऊ दिली जात नाही. यावर दिल्ली पोलिसांनी खुलासा करताना नागरिकांनी कोणत्याही पडताळणीशिवाय अफवा किंवा अपमाहिती पसरवू नये, असे आवाहन केले.
अभिजीत दीपके यांचे गंभीर आरोप
अभिजीत दीपके म्हणाले की, "सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या संघर्षाने आम्ही घाबरलेलो नाही. उलट या घटनेमुळे आंदोलनात अधिक लोक सामील झाले आहेत. सरकारने आमचा वेळ वाया घालवला. त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला बोलावून त्यांचे मोबाइल फोन जप्त केले. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी अक्षरशः नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आमच्या टीमला पांगवण्याची सरकारची संपूर्ण योजना होती जेणेकरून गोंधळ उडल्यावर तिथे कोणीही उपस्थित राहणार नाही. म्हणूनच त्यांना पाच तास थांबवून आमचा वेळ वाया घालवला. एकीकडे तुम्ही चर्चेचे आवाहन करता, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांवर लाठीमार करता, हे योग्य नाही. आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे." दरम्यान, दीपके यांच्या आरोपांवर केंद्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


