जळगाव: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातून गुरु-शिष्य नात्याला पुरता काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शाळेतील नराधम शिक्षकाने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अवघ्या ९-१० वर्षांच्या निष्पाप विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकाविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. नंदलाल नारायण मराठे असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही तिच्या कुटुंबासह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते आणि स्थानिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकते. संशयित आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा रोज सकाळी शाळा भरण्यापूर्वी १० वाजता त्या चिमुरडीला शाळेत झाडू मारण्याच्या बहाण्याने एकटीला बोलावून घ्यायचा. शाळेत कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन तो तिच्यासोबत अत्यंत घृणास्पद कृत्य करायचा. इतकेच नव्हे, तर तो तिला स्वतःच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा. नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३० एप्रिल २०२६ रोजी देखील या नराधमाने शाळेत तिच्यावर अत्याचार केला होता.
हा धक्कादायक प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने सुरू होता. चिमुरडीने या कृत्याला विरोध केल्यास हा शिक्षक तिला बेदम मारहाण करायचा. "जर हा प्रकार कोणाला सांगितलास, तर तुझे आई-वडील मरून जातील," अशी भयंकर धमकी देऊन तो तिला गप्प बसवायचा, ज्यामुळे ती प्रचंड घाबरली होती.
शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्यानंतर पीडित मुलगी सुट्ट्या घालवण्यासाठी तिच्या मावशीच्या घरी गेली होती. तिथे अचानक तिची प्रकृती खालावली आणि तिने जेवण करणे पूर्णपणे बंद केले. तिच्या वागण्यात बदल झाल्याचे पाहून नातेवाईकांनी तिला विश्वासात घेऊन प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा त्या चिमुरडीने रडत रडत तिच्यासोबत घडलेला हा सर्व भयानक प्रकार नातेवाईकांना सांगितला. हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने धरणगाव पोलीस ठाणे गाठून नराधम शिक्षकाविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षक नंदलाल मराठेला बेड्या ठोकल्या असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
महाराष्ट्र
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!






















Subscribe to my channel



