
Mumbai : राज्यात महसूल विभागातर्फे करारनाम्यात दस्तावेजाचे चुकीचे वर्गीकरण केल्यामुळे मुद्रांक शुल्काचा दर कमी लागू करण्यात आला असून, यामुळे १०.५० कोटींचे कमी मुद्रांक शुल्क आकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती ‘कॅग’च्या अहवालाच्या निमित्ताने समोर आली आहे. याशिवाय मुंबईतील एका मालमत्तेचे ६२.२८ कोटी रुपये मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनानुसार ३.११ कोटी रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात आले होते. मात्र, लेखापरीक्षणात या मालमत्तेचे मूल्यांकन १००.११ कोटी रुपये निर्धारित झाले. त्यामुळे या मालमत्तेचे पाच कोटी रुपये मुद्रांक शुल्क आकारणे गरजेचे असताना १.८९ कोटी रुपये शुल्क आकारण्यात आल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.
अहवालानुसार भाडेपट्टा कराराच्या बाबतीतही गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. पाच वर्षांच्या कराराचा कालावधी प्रत्यक्षात दहा वर्षांचा असताना त्याची योग्य गणना न केल्यामुळे २९.७१ लाखांच्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीची कमी आकारणी झाली. याशिवाय एमव्हॅट नियमांतर्गत अतिरिक्त वजावटींना परवानगी दिल्यामुळे ९६.८४ लाखांचा कर आणि त्यावरील व्याज वसूल करण्यात आले नाही. तरी जीएसटी अंतर्गत ई-वे बिल प्रणालीतही मोठ्या त्रुटी उघड झाल्या आहेत. काही करदात्यांनी ‘निरंक’ रिटर्न दाखल करूनही प्रत्यक्षात व्यवहार केल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडून ३.५३ कोटींचा कर वसूल होणे बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
‘कॅग’ने या अहवालात कर वसुली सुधारण्यासाठी, तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी आणि ई-वे बिल प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात एकूण सहा शिफारशींचा समावेश करण्यात आला आहे. अंतिम प्राप्तकर्त्यांकडून आयटीसी वसूल करण्यासाठी योग्य कारवाई करण्याची शिफारस यात करण्यात आली आहे. त्याशिवाय तपासणीदरम्यान व दंडाची मागणी करण्यासाठी आणि दायित्व व रोख खातेवहींचे समायोजन करून ते सरकारी खात्यात प्रदान करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




