
Beed : रस्त्यावरील बेजबाबदार आणि भरधाव वेगाचा आणखी एक भीषण बळी समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका भरधाव टिप्परने कारला दिलेल्या भीषण धडकेत कारने अचानक पेट घेतला. कारमध्ये लागलेली आग एवढी भीषण होती की, आत बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही. परिणामी, गाडीमध्येच अडकून पडलेल्या माय-लेकाचा होरपळून जागीच दुर्दैवी अंत झाला. ही हृदयद्रावक घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कापसी फाट्यावर घडली आहे. या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी (वय ४२ वर्षे) आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय २५ वर्षे) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण आष्टी तालुक्यावर आणि बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
थरारक आणि दुर्दैवी अपघात
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पुष्पा श्रीहरी पुरी आणि त्यांचा तरुण मुलगा ऋषिकेश पुरी हे दोघे आपल्या कारमधून आष्टीकडून बीडच्या दिशेने प्रवासाला निघाले होते. त्यांची कार कापसी फाट्याजवळ आली असता, समोरून येणाऱ्या एका अनियंत्रित आणि भरधाव टिप्परने (क्रमांक MH 16 CD 7305) त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि काही क्षणातच कारने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे माय-लेकाला कारचे दरवाजे उघडून बाहेर पडता आले नाही. बघता बघता दोघेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
बचावकार्यात अडथळे
घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कारचा झालेला चेंदामेंदा आणि लागलेली आग यामुळे मृतदेह बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले होते. मृतदेह गाडीच्या पत्र्यांमध्ये आणि सीटमध्ये अडकले होते. अखेर प्रशासनाला आणि ग्रामस्थांना तब्बल दीड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करून कटरच्या सहाय्याने गाडीचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढावे लागले.
वडील कीर्तनात मग्न असतानाच काळाचा घाला
या अपघातातील अत्यंत वेदनादायी आणि डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट म्हणजे, मयत ऋषिकेशचे वडील श्रीहरी पुरी हे आष्टी पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून ते एक उत्तम कीर्तनकार देखील आहेत. ज्यावेळी त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचा संसार आणि पोटचा तरुण मुलगा संपला, नेमक्या त्याच वेळी पुरी महाराज एका ठिकाणी हरीनामाच्या कीर्तनात मग्न होते.
कीर्तनात हरिनामाचा गजर चालू असतानाच त्यांच्या कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळल्याचे समजताच उपस्थित भाविक आणि नागरिकांचे डोळे पाणावले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात असून, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
शहर
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
- नाशिक: "राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ" सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत-महंतांशी संवाद; बाधितांच्या पुनर्वसनाची दिली मोठी हमी!
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!


























Subscribe to my channel




