
Pune : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरातसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. "वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे," असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विरोधकांचा वाढता दबाव आणि पक्षांतर्गत नाराजी
भोंदू बाबा अशोक खरातला 'गुरू' मानणे रूपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर टीका होत होती. पक्षातील अनेकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे केली होती. अखेर वाढता दबाव लक्षात घेता, चाकणकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
सुनेत्रा पवारांना लिहिलेल्या पत्रात मांडली भूमिका
रूपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा." राजीनाम्यासोबतच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ही सर्व परिस्थिती वेदनादायक असल्याचे नमूद केले.
"माझा गैरकृत्यांशी कोणताही संबंध नाही"
चाकणकर यांनी पत्रात पुढे म्हटले की, "खरात प्रकरणाबाबत मी पहिल्या दिवसापासूनच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात माझा दुरान्वये संबंध नाही. आजही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि तपासादरम्यान या सर्व बाबी स्पष्ट होतीलच. कोणतेही पुरावे नसताना केवळ माध्यमांमधून होणारे खोटे आरोप वेदनादायक आहेत. सत्य लवकरच सिद्ध होईल." या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे यापूर्वीच केली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकर यांनी आपली बाजू मांडली होती. "मी अशोक खरातला गुरू मानले हे खरे आहे, मात्र त्याच्या कृत्यांची मला कल्पना नव्हती. जेव्हा हे सर्व समजले, तेव्हा त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती," असे त्यांनी स्पष्ट केले. आपण महिला असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य करून बदनाम केले जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आता सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर चाकणकर यांनी पक्षीय पदाचाही त्याग केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर पक्ष नेतृत्व सुनेत्रा पवार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- कोल्हापुर: लपंडाव खेळताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श होऊन ९ वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली



























Subscribe to my channel




