
Pune : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात आज वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी बारामतीतील नागरिक मोठ्या संख्येने बारामती पोलीस ठाणे येथे एकवटले. घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार तसेच युगेंद्र पवार यांनी बारामती पोलीस ठाण्यात दाखल होत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित नागरिकांनी 'अमर रहे अजितदादा अमर रहे', अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अपघातामागील नेमकी कारणे समोर यावीत तसेच संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली.
बारामतीकरांच्या भावनांचा उद्रेक
बारामतीकरांच्या भावनांचा उद्रेक यावेळी स्पष्टपणे दिसून आला. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या जनतेने अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित करत या प्रकरणाचा संपूर्ण तपास व्हावा, संबंधित सर्व बाबींची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी केली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने पोलीस ठाणे परिसरात बंदोबस्त वाढवला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांच्या मागणीनंतर या प्रकरणाच्या चौकशीबाबत पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दादांचे समर्थक, दादांचे प्रेमी
दरम्यान, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या युगेंद्र पवार यांनी बोलताना म्हटलं की, 'व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही, आमच्या सगळ्यांची मागणी आहे. इथे दादांचे समर्थक, दादांचे प्रेमी आणि बारामतीचे नागरिक जमले आहेत आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा, योग्य ती कारवाई व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. आम्ही सगळे रोहित दादांच्या मागे उभे आहोत. अजित दादांना न्याय मिळाला पाहिजे, या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. बारामती पोलिसांकडून न्याय मिळेल याची आम्हाला 100% खात्री आहे. डीजीसीएचा रिपोर्ट आला होता, त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की क्रिमिनल नेगलिजेंसमुळे विमानाचा मेंटेनन्स न केल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. हे आपल्याला रिपोर्टमध्ये दिसताना, क्रिमिनल नेगलिजेंस जर हे डीजीसीएकडून येत असेल तर मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं युगेंद्र पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



