
Pune : ‘विमान एका बाजूला कलल्याचे दिसल्यानंतर ते पडणार म्हणून पोरांनी गलका केला. तोपर्यंत ते कोसळले. आम्ही जिवाच्या आकांताने मोटारसायकलवरून तेथे धाव घेतली. तोपर्यंत विमानातून कोणी तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. तितक्यात खूप मोठा स्फोट झाला आणि आमच्या नजरेसमोर होत्याचे नव्हते झाले. या स्फोटाने अजितदादांना आमच्यापासून हिरावून घेतले हा धक्काच इतका मोठा होता की त्यातून अजून सावरता येत नाही...’ गोजूबावी या बारामती विमानतळाच्या गावाचे सरपंच कल्याण आटोळे सांगत होते. सांगतानाही त्यांना अश्रू आवरत नव्हते.
अजित पवार यांच्या अपघाताची पहिली खबर पोलिसांना देणारे आटोळे यांनी “महाराष्ट्र टाइम्स’ला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, 'गोजूबावीच्या विमानतळावर विमानं येणं-जाणं आमच्यासाठी नवीन नाही. आज 'दादा' (अजित पवार) विमानाने येणार आहेत, हे आम्हाला माहिती होतं. मात्र, अचानक विमानाचा वेगळाच आवाज आला. त्यामुळे चमकून पाहिलं असता, विमान डाव्या बाजूला कलून जमिनीवर कोसळले. त्यातून धूर निघत होता. 'पडले.. पडले...' असे ओरडत आम्ही गावकऱ्यांनी जिवाच्या आकांतानं मोटारसायकलीवरून विमानाच्या दिशेने धाव घेतली.'
|
Ajit Pawar Death : टेकऑफपूर्वी विमानातील अजित पवारांचा शेवटचा फोटो समोर; महाराष्ट्र हादरला |
'सकाळी आठ वाजून ४४ मिनिटाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मी आयडीबीआय बँकेपाशी डेअरीतच थांबलो होतो. गोजूबावीच्या विमानतळावर विमानांचे प्रशिक्षण चालते. बडे मंत्री, उद्योगपतींचे हवाई दौरे असतात. त्यामुळे विमानाचा आवाज आम्हाला काही नवा नाही. मात्र, या विमानाचा आवाज वेगळाच येत होता. विमान डावीकडे कलून पार खाली आले होते. ते अर्धा मिनिट पुढे गेले नसते, तर गावातच कोसळले असते. धावपट्टीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच विमान कोसळले. मी घाबरून ‘११२’ या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. पण, त्यावर 'एक क्रमांक दाबा, दोन क्रमांक दाबा' अशा तांत्रिक सूचना येत होत्या. त्यामुळे मी अजित पवारांचे निकटवर्तीय व विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर व परिचयाच्या पोलिस अधिकाऱ्याला फोन केला.’
‘विमानाजवळ पोहोचत असतानाच त्यातून कोणी तरी बाहेर पडत असल्यासारखे दिसू लागले. इतक्यात मोठा स्फोट झाला म्हणून आम्ही बिचकून मागे सरकलो. स्फोट होण्यापूर्वी दादा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असावेत. ते दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकला... आमचे पाय थरथर कापत होते. विमान डाव्या बाजूला कलून पडलं होतं. विमानाचा दरवाजा उघडा होता. कदाचित प्रवाशांनी बाहेर उडी मारून जीव वाचवावा, यासाठीचा तो प्रयत्न होता. अचानक एखाद्या बॉम्बसारखा मोठा स्फोट झाला! तो भीषण आवाज आणि आगीचे लोळ पाहून आम्हीही घाबरून मागे पळालो. त्यानंतर थोडी हिंमत एकवटून जवळ गेलो, तेव्हा चित्र विदारक होतं. किरण गुजर तिथे पोहोचले होते, त्यांना रडू कोसळलं होतं. आम्ही ग्रामस्थांनी मिळून विमानातील चार जणांना बाहेर काढलं. त्यात तीन पुरुष आणि एक महिला होती. त्यांच्या अंगरक्षकाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. धावत जाऊन घरातून चादरी आणल्या आणि त्या देहावर पांघरल्या. त्यामध्ये एक अजित पवार होते यावर विश्वासच बसत नव्हता. पण किरण गुजरांनी दादांना ओळखले होते,’ असे आटोळे यांनी सांगितले.
‘पोलिस अधिकारी अपघाताच्या ठिकाणी आले. गावकरीही पोहोचले होते. पण पुढे काय करायचे हेच कोणाला कळत नव्हते. अपघाताच्या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे वाहने खालपर्यंत येत नव्हती. मी गावचा सरपंच असल्यानं तातडीनं गाड्यांसाठी रस्ता मोकळा करून दिला. नगरपालिकेचा पाण्याचा बंब आला खरा; पण काही वेळातच त्याचंही पाणी संपलं. पोलिसही हतबुद्ध झाले होते. इतकी मोठी घटना घडूनही यंत्रणा हतबल दिसत होती. पण दुःखद गोष्ट ही की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृतदेह अर्धा-पाऊण तास तिथेच होता. अखेर अॅम्बुलन्स पोहोचल्या व आम्ही ते मृतदेह हलविले. आमच्या लाडक्या अजित पवारांना अशा स्थितीत बघण्याची वेळ येईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. पण काळाने ती वेळ आज आणली. त्यावर अजूनही विश्वास बसत नाही,’ अशा शब्दांत आटोळे यांनी भावना व्यक्त केल्या.
शहर
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel





1 thought on “Ajit Pawar Death : विमान एका बाजूला झुकताच प्रवाशांमध्ये घबराट; मुलांचा आक्रोश, बाहेर पडण्याचा प्रयत्न… पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं”