
Baramati : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकी बोलावली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. राज्याच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असलेल्या आरक्षणाबाबत चर्चा करण्याऐवजी बैठकीवर बहिष्कार टाकून त्यांनी पळ काढला आहे. त्यांची ही दुटप्पी भूमिका मराठा आणि ओबीसी समाजासाठी योग्य नाही असे म्हणत, मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढीवारी निमित्त पाहणी दौऱ्यास निघाले असताना बारामती विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आम्ही सांगितल्याप्रमाणे दिले. ओबीसी समाजाचे कुठलेही कमी न करता दिले. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अनेक लोक विरोधात प्रयत्न करत असून अद्याप कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी जस्टीस शिंदे कमिटी काम करत आहे. सगेसोईरेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आक्षेप आले आहेत. कालच्या बैठकीत देखील अनेक नवीन मुद्दे आले आहे, यावर देखील सरकार काम करत आहे. राज्याच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असलेल्या आरक्षणाबाबत चर्चा करण्याऐवजी बैठकीवर बहिष्कार टाकून पळ काढणे योग्य नव्हते, विरोधकांची दुटप्पी भूमिका मराठा आणि ओबीसी समाजासाठी योग्य नाही असे म्हणत, मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टिका केली.
|
|
राज्य सरकारने यावर्षी आम्ही वारकरी महामंडळ देखील सुरू केले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी निर्णय घेतले जातील. प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला. टोलमुक्त वारी हे देखील केले. कुठे काहीही कमी न पडता या वर्षीची वारी चांगली व्हावी यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.
पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार..
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यांच जल्लोषात सर्वांनी स्वागत केले. आम्ही विकासासाठी त्यांना बोलावले होते. मुंबई एमएमआर च्या माध्यमातून लोकांना दिलासा देणारे प्रकल्प केले आहे. राज्यात देखील दोन अडीच वर्षात अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून काही पूर्ण झाले, तर काही प्रगतिपथावर आहेत. जे दोन वर्षात आम्ही काम केले त्याची तुला अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या बरोबर केली. त्यांनी जे काही स्पीड ब्रेकर घातले होते, ते सर्व स्पीड ब्रेकर आम्ही काढले. त्या उद्योगांना चालना दिली. समृद्धी हायवे, अटल सेतू, कोस्टल हायवे, मेट्रो असे सर्व प्रकल्प सुरू केले. नवीन प्रकल्प हाती घेतले. कल्याणकारी योजना लॉन्च केल्या. आणखी मेहनत करू आणि पुन्हा एकदा या राज्यात महायुतीचे सरकार आणू असा निश्चय यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




