डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. खोणी परिसरातील प्रसिद्ध पलावा सिटी (डाऊन टाऊन आणि क्राऊन पलावा) वसाहतीमध्ये ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे एक अत्यंत मोठी मोहीम राबवली आहे. शनिवारी मध्यरात्री ३ वाजेपासून ते सकाळी १० वाजेपर्यंत चाललेल्या या धडक कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये (Combing Operation) पोलिसांनी तब्बल २४ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण डोंबिवली आणि कल्याण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पलावा परिसरात अनेक परदेशी नागरिक बेकायदेशीरपणे आणि संशयास्पद रित्या वास्तव्य करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त (DCP) अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांच्या पथकांनी संपूर्ण पलावा सिटी परिसराला वेढा घातला. शेकडो पोलिसांच्या उपस्थितीत एकाच वेळी अनेक इमारतींमध्ये झाडाझडती सुरू करण्यात आली.
१४ पुरुष, ६ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश:
या सात तासांच्या मॅरेथॉन कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण २४ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले. यामध्ये १४ पुरुष, ६ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी जेव्हा त्यांच्याकडे भारतात राहण्याबाबतच्या अधिकृत कागदपत्रांची मागणी केली, तेव्हा धक्कादायक बाबी समोर आल्या. ताब्यात घेतलेल्यांपैकी ८ जणांकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेला वैध व्हिसा किंवा कोणतेही अधिकृत पासपोर्ट-कागदपत्रे आढळून आली नाहीत. म्हणजेच ते बेकायदेशीरपणे येथे राहत होते.
९ जणांवर ड्रग्ज तस्करांचे गुन्हे; कारवाई दरम्यान महिला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्याचा प्रयत्न:
अधिक तपासात समोर आले की, ताब्यात घेतलेल्या २४ पैकी ९ नायजेरियन नागरिकांवर यापूर्वीच राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अमली पदार्थ तस्करी (Drugs Smuggling) आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिसांची ही छापेमारी सुरू असताना एका नायजेरियन महिलेने पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली. या थरारक घटनेत ती महिला गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे तिच्यावर कडक पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, या सर्व परदेशी नागरिकांच्या व्हिसा आणि पासपोर्टची सखोल पडताळणी सुरू आहे. तसेच, ज्या घरमालकांनी किंवा एजंटांनी पोलीस पडताळणी (Police Verification) न करता आणि नियमांचे उल्लंघन करून या परदेशी नागरिकांना घरे भाड्याने दिली होती, त्यांच्यावरही मानपाडा पोलीस ठाण्यात कडक कायदेशीर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या परिसरात अमली पदार्थांचे रॅकेट सक्रिय आहे का, याचाही सखोल तपास पोलीस करत आहेत.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- शिरुर पोलिसांची धडक कारवाई; रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी पिस्तूल व काडतुसासह आरोपी गजाआड!
- पुणे: पुण्यातील १५ ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळल्याने खळबळ; बॉम्बशोधक पथकाच्या कसून तपासणीनंतर अफवा असल्याचे स्पष्ट!
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel





https://shorturl.fm/07Ne8