शेखर गुप्ता यांचा कॉलम:कॉर्पोरेट इंडियासाठी पुढचा मार्ग कसा असेल?

‎‎‎‎‎‎‎‎पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिक्कीच्या वार्षिक‎सर्वसाधारण सभेत कॉर्पोरेट इंडियाला कडक शब्दांत‎सुनावले. पंतप्रधान राग, निराशा आणि अगदी हतबलतेच्या‎सुरात बोलत होते. तुम्हाला सक्रिय करण्यासाठी मी आता‎आणखी काय करू, असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता.‎एखाद्या लष्करी जनरलने स्फूर्तिदायक भाषणे देऊन आणि‎सैन्याचे ‘स्पिरिट’ वाढवूनही समोरची टेकडी जिंकण्यात‎अपयशी ठरलेल्या आपल्या सैन्याला फटकारावे, तसेच हे‎काहीसे होते. उद्योजकता वाढवण्यासाठी कोणतेही सरकार‎काय करू शकते? ते बरेच काही करू शकते- नियंत्रणांतून‎मुक्ती, किमान सरकारी हस्तक्षेप, बाजारावर देखरेख,‎आर्थिक शिस्त, परवान्यांतून मुक्ती आणि गुंतवणुकीवरील‎निर्बंधांतून मुक्ती. ‘स्पिरिट’ वाढवणाऱ्या या पॅकेजमध्ये‎करकपात नक्कीच प्रभावी ठरते.‎ पंतप्रधानांच्या निराशेचे एक मोठे कारण म्हणजे, कॉर्पोरेट‎इंडिया या फायद्यांचा वाटा आपल्या कर्मचाऱ्यांच्या‎वेतनवाढीत, अधिक रोजगार निर्मितीत किंवा गुंतवणुकीच्या‎रूपात देत नाही. कॉर्पोरेट नफ्यात वाढ होऊनही असे‎घडलेले नाही. ही फौज टेकडीवर हल्ला करायला एक तर‎तयार नाही, किंवा खूप घाबरलेली आहे; अथवा करातील‎सवलत स्वतःच्या खिशात घालून सुरक्षित असल्याच्या‎समाधानातच राहू इच्छिते. पंतप्रधानांनी जे सांगितले,‎त्याकडे लक्ष द्या.‎ ते म्हणाले, 2014 मध्ये बेसिक कॉर्पोरेट टॅक्सचा दर 30‎टक्के होता. आम्ही तो कमी करून 22 टक्के केला. आज‎भारतात 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही इन्कम‎टॅक्स लागत नाही. मला माहीत आहे, तुम्ही यावर टाळ्या‎वाजवणार नाही, कारण तुम्हाला कितीही दिले तरी तुमचे‎पोट भरत नाही. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले‎का? त्यांची संख्या वाढवली का? नाही. ‘मोदीजी, तुम्ही‎करा, आम्ही पाहतो’ अशी तुमची वृत्ती आहे.‎ आता कॉर्पोरेट इंडिया आपल्या जखमांवर फुंकर घालत ‎‎असताना काँग्रेसने पंतप्रधानांचे शब्द अचूक पकडले आहेत. ‎‎जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये या‎कोंडीसाठी उद्योग जगताला नाही, तर सरकारलाच‎जबाबदार धरले. यासाठी त्यांनी वशिलेबाजीची‎भांडवलशाही, नियमांचा फास, भीतीचे वातावरण आणि‎तपास यंत्रणांना दिलेली मोकळीक यांना कारणीभूत ठरवले. ‎‎अमेरिकेत राहुल गांधी यांनीही ‘आम्ही तर आधीच‎सांगितले होते’ अशी प्रतिक्रिया दिली.‎ येथे मी अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर काही बोलण्याच्या ‎‎मनःस्थितीत नाही. आपल्याला माहीत आहे की कॉर्पोरेट ‎‎इंडियाने 7 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे, पण त्या ‎‎प्रमाणात तो गुंतवणूक किंवा विस्तार करत नाही, रोजगार ‎‎वाढवत नाही. स्टार्टअप कंपन्या वाढत आहेत, मात्र ‎‎उद्योजकतेवर बर्फ साचला आहे. बहुतांश वाढ सरकारी ‎‎खर्चाच्या, विशेषतः मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्चाच्या ‎‎जोरावर होत आहे. पण जर कॉर्पोरेट इंडिया जोखीम ‎‎पत्करण्यापासून इतके दूर पळताना दिसत असेल, तर हे ‎‎अचानक घडलेले नाही. हे वातावरण अनेक वर्षांपासून‎आहे. काही जण मागणीत घट झाल्याची तक्रार करतात, तर ‎‎काहींचे म्हणणे आहे की नियमांनी त्यांचा गळा आवळला‎आहे. आजही अनेक लहानसहान गोष्टींसाठी अनेक फॉर्म‎भरावे लागतात; अगदी निर्यातीसारख्या चांगल्या गोष्टीच्या‎परवानगीसाठीही. कारण रिझर्व्ह बँकेला देशात येणाऱ्या‎प्रत्येक डॉलरवर नजर ठेवायची असते. आणि हो, प्रत्येक‎अर्जाच्या तीन प्रती भराव्या लागतात. सरकारने धोरणांमध्ये‎किरकोळ सवलती दिल्या असतील, पण नोकरशाहीची‎पकड अधिकच घट्ट झाली आहे. गुगलची मदत न घेता‎झटकन एक कोडे सोडवा. तुम्ही खाण मंत्रालय, औषध‎मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयाच्या मंत्र्यांची नावे सांगू‎शकता का? मी या तिन्हींचा उल्लेख यासाठी केला, कारण‎पंतप्रधानांनी विशेषतः या क्षेत्रांतील कॉर्पोरेट इंडियाच्या‎अपयशावर भर दिला : आपण लोहखनिजासारख्या कच्च्या‎मालाची निर्यात का करतो? आपल्याकडे बॉक्साइटचा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎खजिना आहे, तरीही आपण तयार स्टील आणि विशेष‎ॲल्युमिनियम ॲलॉयची आयात का करतो? आपण मोठ्या‎प्रमाणावर औषधांची निर्यात करतो, तरीही ‘एपीआय’साठी‎(औषधे बनवण्याचे साहित्य) चीनवर का अवलंबून‎आहोत? परंतु सत्ता पीएमओपर्यंत मर्यादित राहिली आहे,‎ज्याच्यावर स्वतःचाच इतका भार आहे की ते प्रत्येक‎गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे निर्णय नोकरशाही‎घेते. कॉर्पोरेट इंडियाने या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे.‎ ते अशा पद्धतीने काम भागवून नेत आहेत, जी त्यांना‎सर्वात चांगली माहीत आहे : नफ्यातील काही हिस्सा अशा‎प्रकारे वाटणे की तो कायदेशीरदृष्ट्या वैध आणि स्वच्छ‎दिसेल, पण त्यातून बरेच काही सूचित होते. विशेषतः अर्थ‎मंत्रालयातून निवृत्त होणाऱ्या सचिवांची संख्या पाहा, ज्यांनी‎प्रभावशाली कंपन्यांच्या बोर्डावर जागा मिळवली आहे‎किंवा खाजगी क्षेत्रातील अनेक बँकांचे व शेअर बाजारात‎सूचिबद्ध नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे अध्यक्ष बनले आहेत.‎ सरकार आर्थिक सुधारणा तर करत आहे, पण ते जेवढ्या‎सुधारणा करण्याचा विचार करते, त्यापेक्षा जास्त‎नोकरशाहीचे हात बळकट होतात. कॉर्पोरेट इंडिया संकेत‎देऊन आधीच तिच्याशी तडजोड करून घेते. हाच‎विरोधाभास आहे. याचा परिणाम असा होतो की, वरच्या‎पातळीवर जे विकेंद्रीकरण होते, ते मध्येच येऊन थबकते.‎सरकार धोरणात्मक गोंधळापासून अलिप्त नाही.‎ 1991 नंतरचे सर्वच अर्थमंत्री हेच सांगत आले आहेत‎की, आर्थिक सुधारणांचा गाभा म्हणजे संतुलित आणि‎अंदाजित करप्रणाली. ही गोष्ट तुम्ही या सरकारबद्दल म्हणू‎शकत नाही, कारण हे सरकार कंपन्यांवर ज्या दराने कर‎लावते, त्याच्या जवळपास दुप्पट दराने व्यक्तींवर कर लावते.‎याचे ठळक उदाहरण म्हणजे, त्यांनी ‘सॉवरेन गोल्ड‎बॉन्ड’वरील कॅपिटल गेन्स टॅक्सच्या सवलतीमध्ये पूर्वलक्षी‎प्रभावाने बदल केले.‎ 2007 मध्ये ‘सीआयआय’च्या सर्वसाधारण सभेत‎पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही कॉर्पोरेट नेत्यांना ते स्वतः‎मोठे वेतन घेतात म्हणून फटकारले होते. विडंबना अशी आहे‎की, त्या वेळचे वातावरण आणि संदेश आजच्या अगदी‎उलट होते. त्या वेळी ‘सीआयआय’चे प्रमुख सुनील मित्तल‎यांनी याला उत्तर म्हणून आपल्या वेतन-बोनसचा मोठा‎हिस्सा दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी मी‎लिहिले होते की, कॉर्पोरेट इंडियाने पंतप्रधानांना सांगायला‎हवे होते की ते त्यांचे वेतन ठरवत नाहीत. जर ते‎प्रामाणिकपणे कर भरत असतील, तर त्यांना त्यांच्या वाटेवर‎सोडून द्यावे. अर्थात, असे काहीही घडले नाही. कॉर्पोरेट‎इंडियाने ‘सीएसआर’सारखा प्रतिगामी विचारही‎स्वीकारला. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ वाढीच्या प्रमाणात गुंतवणूक नाही‎आपल्याला माहीत आहे की कॉर्पोरेट‎इंडियाने 7 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली‎आहे, पण त्या प्रमाणात तो गुंतवणूक किंवा‎विस्तार करत नाही, रोजगार वाढवत नाही.‎स्टार्टअप कंपन्या वाढत आहेत, मात्र‎उद्योजकतेवर बर्फ साचला आहे. बहुतांश‎वाढ सरकारी खर्चाच्या, विशेषतः मोठ्या‎पायाभूत सुविधांच्या जोरावर होत आहे.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *