उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी येथे निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात नुकताच झालेला अपघात आठवा. 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:05 वाजता अचानक बोगद्यात पाणी भरून ढिगाऱ्यात अनेक मजूर अडकले आणि ही जागा धोकादायक रेस्क्यू झोन बनली. बेपत्ता लोकांच्या शोधात रेस्क्यू वर्कर्स 24 तास चिखल, अस्थिर परिस्थिती आणि वाढत्या जलस्तराशी झुंजज होते. 18 ऑगस्टपर्यंत मृतांची संख्या 10 झाली. अपघातावेळी रेस्क्यू वर्कर्स आणखी एका अशा शत्रूशी लढत होते, जो रोज संध्याकाळी डोंगरांत येतो आणि त्याला रोखण्याची क्षमता कोणातच नव्हती- तो म्हणजे अंधार. रेस्क्यू टीममध्ये कदाचित कोणीतरी म्हटले असेल की, ‘जर अपघात सकाळी 7:05 वाजता झाला असता तर आपण सूर्यप्रकाशात अधिक चांगले काम करू शकलो असतो.’ आता याच बचाव कार्याची कल्पना एका असाधारण शक्यतेसह करा. रात्री पाऊस पडत आहे. बोगद्याचे प्रवेशद्वार चिखल आणि ढिगाऱ्याने वेढलेले आहे. दृश्यमानता कमी आहे. रेस्क्यू टीमला काम सुरू ठेवायचे आहे. पण एक्सकेव्हेटरची प्रत्येक हालचाल, अस्थिर ढिगाऱ्याचे प्रत्येक निरीक्षण आणि रेस्क्यू वर्कर्सचे प्रत्येक पाऊल अत्यंत कठीण होत चालले आहे. तेव्हाच कंट्रोल रूममध्ये कोणीतरी म्हणते, ‘सूर्य सुरू करा करा.’ हे ऐकायला सायन्स फिक्शनसारखे वाटेल, पण कॅलिफोर्नियाची कंपनी ‘रिफ्लेक्ट ऑर्बिटल’ असे काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत आहे, जे या शक्यतेच्या अगदी जवळ आहे. ही कंपनी असे सॅटेलाइट विकसित करत आहे, ज्यावर मोठे रिफ्लेक्टिव्ह सरफेस लावलेले असतील. हे सरफेस सूर्यास्तानंतर अंतराळातून सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर निवडक ठिकाणी रि-डायरेक्ट करू शकतील. कंपनीचे घोषित व्हिजन आहे- ‘सनलाईट ऑन डिमांड.’ या तंत्रज्ञानाच्या संभाव्य उपयोगांमध्ये सर्च अँड रेस्क्यूचाही समावेश आहे. कल्पना करा की पीपलकोटीच्या रेस्क्यू झोनवरून ‘रिफ्लेक्ट ऑर्बिटल’चा एखादा सॅटेलाइट जात आहे. त्याचा आरसा निश्चित क्षेत्राकडे वळवला गेला आहे. अंतराळातून सूर्यप्रकाश रि-डायरेक्ट केला गेला. काही क्षणांपूर्वीच हिमालय क्षेत्राच्या अंधारात बुडालेल्या रेस्क्यू साईटवर अचानक अतिरिक्त प्रकाश येतो. एक्सकेव्हेटर ऑपरेटर ढिगारा अधिक स्पष्ट पाहू शकतो. रेस्क्यू टीम बोगद्याच्या तोंडावरील बदल पाहू शकते. बचाव साधने नेणारे वर्कर्स अधिक विश्वासाने पुढे जाऊ शकतात. मेडिकल टीम ट्रीटमेंट एरिया बनवू शकते. सर्च टीम दिवसाच्या प्रकाशाची वाट पाहण्याऐवजी शोध सुरू ठेवू शकते. हे तंत्रज्ञान शक्तिशाली फ्लड लाईट्स, जनरेटर किंवा रेस्क्यू इक्विपमेंटला पर्याय नसेल. हे बंद बोगद्यात दुपारसारखा प्रकाश निर्माण करू शकणार नाही. पण ‘रिफ्लेक्ट ऑर्बिटल’च्या पहिल्या डेमॉन्स्ट्रेशनमधून अशी अपेक्षा आहे की, सॅटेलाइट एकदा गेल्यानंतर सुमारे पाच मिनिटांसाठी पौर्णिमेच्या चंद्राएवढा प्रकाश मिळू शकेल. कंपनी 2026 मध्ये आपला पहिला डेमॉन्स्ट्रेशन सॅटेलाइट पाठवण्याची योजना आखत आहे. ऐकायला हे नवल आहे, पण दुसऱ्या दृष्टीने विचार करा, बचाव कार्यात नेहमीच कोणत्या चमत्काराची प्रतीक्षा नसते. अनेकदा यात केवळ दृश्यमानतेची गरज असते. जर काही अतिरिक्त मिनिटांच्या उपयुक्त प्रकाशामुळे टीमला सुरक्षित मार्ग ओळखण्यास, हालचाली पाहण्यास, मशिनरी अधिक अचूकतेने लावण्यास किंवा महत्त्वपूर्ण शोध सुरू ठेवण्यास मदत मिळाली, तर समजा की तंत्रज्ञानाने आधीच असे काहीतरी साध्य केले, जे आणीबाणीत पैशानेही खरेदी केले जाऊ शकत नाही. आणि ते म्हणजे संकटातील गोल्डन अवर. पारंपारिकपणे जगाने आपत्तींचा सामना करण्यासाठी आधीपासूनची उपलब्ध साधनेच चांगली बनवलीत- मजबूत एक्सकेव्हेटर, उत्तम ड्रोन, थर्मल कॅमेरे, कम्युनिकेशन सिस्टिम, हेलिकॉप्टर आणि मेडिकल इक्विपमेंट. ही वेगळी प्रतिक्रिया रिफ्लेक्ट ऑर्बिटलसारख्या कंपन्यांना रंजक बनवते. निश्चितच, हे तंत्रज्ञान सध्या एक्सपेरिमेंटल आहे. अस्ट्रॉनॉमी, लाइट पोल्युशन, वाईल्ड लाईफ आणि रिफ्लेक्टेड सनलाईटच्या जबाबदारीपूर्ण वापराबाबत गंभीर प्रश्नही आहेत. रिफ्लेक्ट ऑर्बिटल स्वतः म्हणते की त्यांचे सुरुवातीचे डेमॉन्स्ट्रेशन नियंत्रित आणि मर्यादित ठेवण्यासाठी डिझाईन केले गेले.
फंडा असा की, प्रश्न काहीशा वेगळ्या पद्धतीने विचारला जावा : जर नाइट रेस्क्यूच्या वेळी व्हिजिबिलिटी नसेल, तर प्रकाशासाठी पृथ्वीच्या पलीकडेही पाहू शकतो का? नव्या युगातील इनोव्हेटर्स ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चरशिवाय अनेक गोष्टी उपलब्ध करून देण्याचे मार्ग शोधत आहेत. आणि हीच गोष्ट त्यांना स्पेशल जनरेशन बनवते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

रस्ता रुंदीकरणावरून शाही मशिदीवर कारवाई; विरोधात मोठी गर्दी, प्रशासनावर दगडफेकीचा दावा
‘Golden GUYS’ सनी वाकचौरेच्या Mercedesवर पोलिसांची कारवाई! 🚔🚘⚠️
पावसाअभावी सोयाबीन पूर्णपणे वाळलं; शेतकऱ्याने ३ एकर पिकावर फिरवला ट्रॅक्टर!
देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
























Subscribe to my channel



