रघुराम राजन यांचा कॉलम:एआयच्या शर्यतीत पुढे जाण्याच्या‎ स्पर्धेला आता लगाम बसावा

‎‎‎‎‎‎‎‎माझ्या एका मित्राने अलीकडेच एआय-सेफ्टीचा‎अभ्यास करण्यासाठी गणिताच्या प्राध्यापकपदावरून एक‎वर्षाची रजा घेतली आहे. ओपनएआयने 722 शोधनिबंध‎प्रसिद्ध करून असा दावा केला आहे की, यामध्ये‎गणिताच्या अशा 377 प्रश्नांची उत्तरे आहेत, जे यापूर्वी‎कधीच सुटले नव्हते. अशा परिस्थितीत माझ्या मित्राला‎चिंता वाटते की, त्याच्या व्यवसायाला काही भविष्य उरेल‎का? जर एआय इतक्या सहजपणे एका हुशार गणितज्ञाची‎जागा घेऊ शकते, तर आपल्याला चिंता का वाटू नये?‎ याचे एक उत्तर असे असू शकते की, एआय भलेही‎गणित किंवा भौतिकशास्त्रातील एखाद्या न सुटलेल्या‎समस्येचे उत्तर शोधून काढेल; पण माझी बँक अजूनही‎असा भरवशाचा चॅटबॉट बनवू शकलेली नाही, जो मला ‎‎वैतागून एखाद्या माणसाशी बोलण्याची मागणी न करावी ‎‎लागता आर्थिक व्यवहाराची समस्या सोडवेल. एआय‎कंपन्या आपल्या आगामी मॉडेल्सना अधिक असाधारण ‎‎संशोधन क्षमतेने सज्ज करण्यासाठी स्वतःमध्ये सुधारणा ‎‎करण्याचे तंत्रज्ञान वापरत आहेत. काही उद्योगांमधील ‎‎सुरुवातीचे युजर्स अशा बॉटचा वापरही करत आहेत, जे ‎‎निविदांवर वाटाघाटी करणे आणि बिलांची डिलिव्हरीशी ‎‎पडताळणी करणे यांसारखी कामे करत आहेत. मात्र,‎मुख्य प्रवाहातील व्यवसायांत एआय स्वीकारण्याचा वेग‎संथ आहे आणि त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या एआय‎क्षमता अजूनही मर्यादित आहेत.‎ अशा वेळी प्रश्न पडतो की, एआय कंपन्या अधिक‎प्रगत मॉडेल बनवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात‎कम्प्युटिंग संसाधनांचा वापर का करत आहेत, जेव्हा की‎त्यांच्या क्षमतेचा पूर्ण लाभ केवळ मोजकेच लोक घेऊ‎शकत आहेत? बुद्धिमत्तेचे एक नवे आणि वेगवान स्वरूप‎निर्माण करण्याच्या थराराव्यतिरिक्त एक सर्वसाधारण‎धारणा अशी आहे की, जी एआय लॅब सर्वात आधी‎पूर्णपणे ‘सेल्फ-इम्प्रूव्हिंग ’ (स्वतःत सुधारणा करणारे)‎मॉडेल बनवेल, तिला अशा मॉडेलच्या क्षमतेचा फायदा‎होईल आणि ती प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे निघून जाईल.‎ तरीही, इतर प्रतिस्पर्धी लवकरच त्या तंत्रज्ञानापर्यंत‎पोहोचू शकणार नाहीत, असे मानणे कठीण आहे. सर्वात‎पुढे राहणाऱ्या कंपनीला एक-दोन महिन्यांची आघाडी‎नक्कीच मिळू शकते; पण पाठलाग करणाऱ्या कंपन्याही‎असे तंत्रज्ञान शोधू शकतात, ज्याच्या मदतीने त्या झेप‎घेऊन सर्वात पुढे पोहोचतील. आघाडीच्या मॉडेल्सच्या‎स्थानामध्ये होणाऱ्या सततच्या बदलांमुळे एआयच्या‎शर्यतीत आतापर्यंत असेच घडत आले आहे. त्यामुळे‎कोणतीही एक कंपनी कायमस्वरूपी या क्षेत्रावर वर्चस्व‎गाजवेल, असे मानणे कठीण आहे. विशेषतः जेव्हा‎कंपन्या एकमेकांच्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे नोकरीवर‎ठेवू शकतात. असे केवळ तेव्हाच शक्य आहे, जेव्हा‎एखादी कंपनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पूर्णपणे नष्ट करेल.‎कुणाचाही असा हेतू नसेल, अशी आशा आहे.‎ दुसरे कारण असे असू शकते की, आघाडीच्या एआय‎लॅब्सच्या प्रमुखांपैकी कुणालाही एकमेकांवर विश्वास‎नाही की, दुसरा कुणी या असाधारण एआय क्षमतांमधून‎मिळणारी ताकद सांभाळू शकेल. प्रत्येकजण केवळ‎जिंकण्याच्या इच्छेनेच नव्हे, तर या ताकदीचा उत्तम वापर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎फक्त आपणच करू शकतो, या भावनेनेही प्रेरित आहे. या‎शर्यतीला वेग येण्यामागे चीनची भीतीही आहे. चीनचे‎एआय मॉडेल अमेरिकेच्या आघाडीच्या मॉडेल्सपेक्षा‎केवळ काही महिनेच मागे आहेत. आणि चीन खूप जास्त‎मागे पडण्याची शक्यता कमीच आहे. समाज अजूनही‎मोठ्या प्रमाणावर एआयचा स्वीकार करण्यासाठी तयार‎नाही. मात्र, आता आपल्याला कम्प्युटिंग क्षमतेच्या‎विस्ताराचा वेग मंदावण्याचा प्रयत्न दिसू शकतो.‎अमेरिकेतील अनेक राजकीय नेते नवीन डेटा सेंटर्सना‎मंजुरी देण्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.‎एआयच्या विकासाचा वेग सामूहिकरीत्या कमी केल्याने‎चीन आणि अमेरिका यांच्यात बऱ्याच काळापासून‎अपेक्षित असलेली चर्चाही सुरू होऊ शकते की, या‎तंत्रज्ञानाचा वापर मानवतेच्या हितासाठी कसा केला जाऊ‎शकेल. (@प्रोजेक्ट सिंडिकेट)‎ समाज अजूनही मोठ्या प्रमाणात एआयचा‎स्वीकार करण्यासाठी तयार नाही. मात्र,‎आता आपल्याला कम्प्युटिंग क्षमतेच्या‎विस्ताराचा वेग मंदावण्याचा एक प्रयत्न‎दिसू शकतो. अमेरिका आणि चीन या‎दोघांनाही यात सहभागी व्हावे लागेल.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *