आज आपण अशा काळात जगत आहोत, जिथेमाणूस आणि मशीन यांच्यातील अंतर मिटत चाललेआहे. मशीनच्या तुलनेत माणसाची उंची कमी होत आहे.पण त्याच वेळी आपले सर्व शब्द घेऊन एक डिक्शनरीसमोर येते आणि जाहीर करते की, या जगाला पुन्हाएकदा त्या माणसाकडे पाहण्याची गरज आहे. त्याचमाणसाने मशीन बनवले, एआयची निर्मिती केली आणिह्यूमनॉइड रोबोटला ‘केअर’च्या कोमल हावभावांचाअल्गोरिदमही दिला. मात्र, या सगळ्यात तो माणूसच मागेपडला, ही वेगळी गोष्ट. पण केंब्रिज डिक्शनरीने त्याला मागे पडू दिले नाही. तिने2026 चा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून ‘ह्यूमन’ म्हणजेचमाणूस या शब्दाची निवड केली आहे. हा एक खोलआणि अत्यंत अर्थपूर्ण संदेश आहे. केंब्रिजच्या मते,‘ह्यूमन’ या विशेषणाचा अर्थ असा आहे- ‘असे गुण,उणिवा आणि भावना, ज्या केवळ माणसांमध्ये असतात;देव, प्राणी किंवा मशीनमध्ये नाही.’ वर्षाचा शब्द म्हणून ‘ह्यूमन’ची निवड होणे, हेमाणसाला वाचवण्याचे एक आवाहनही वाटते.आजकाल हा शब्द अनेकदा जोडशब्दांमध्ये दिसतो. जसेकी, माणसाने लिहिलेले, माणसाने बनवलेले, माणसानेतयार केलेले, माणसाने मंजूर केलेले इत्यादी. असे घडतआहे, कारण एखादी भावना किंवा प्रयत्न निव्वळमानवीच आहे, हे आता आपण सहजासहजी स्वीकारूशकत नाही. त्यामुळे ‘ह्यूमन’ शब्दाची निवड एकासामाजिक आणि नैतिक अस्वस्थतेचेही दर्शन घडवते.आपण माणूस आहोत, हे आपल्याला वारंवार आणिजवळपास जोर देऊन का सांगावे लागत आहे? पूर्वी तरअशी गरज कधीच भासली नव्हती. हा बदल केवळ अल्गोरिदमपुरता मर्यादित नाही, तर तोएका व्यावहारिक बदलाचेही प्रतीक आहे. कारणआजकाल घरांमध्येही सदस्यांना ती मानवी भावनावारंवार सांगावी आणि दाखवावी लागत आहे. इतकेचकाय, तर ऑफिसमध्ये कुणी जास्त ‘ह्यूमन’ दिसले किंवाबोलण्यात भावुकता असली, तरी आश्चर्य वाटते. तरीही,आपला बॉस मशीनसारखा कमी आणि माणसासारखाजास्त असावा, अशीच प्रत्येकाची इच्छा असते. आजचाकाळ डेटा, निकाल आणि बाजारकेंद्रित आहे. अशाकाळात माणूस बनून राहणे ‘रिस्की’ झाले आहे. पण हेहीतितकेच खरे आहे की, आपल्या आचरणात आणिव्यवहारात ते मानवी गुरुत्वच महत्त्वाचे असते. जेव्हाएखादे काम यांत्रिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर केलेजाऊ शकते, तेव्हा ‘माणूस’ हा शब्द त्या कामाचा मूळस्रोत, जबाबदारी आणि त्याच्या खऱ्या मूल्याची ओळखबनतो. आज काहीही लिहिले, वाचले, बोलले जावो किंवाकुणाची काळजी घेतली जावो; यामागे खरोखरच कुणीमाणूस आहे का, हा प्रश्न आता अचानक महत्त्वाचा ठरलाआहे. या शब्दाच्या निवडीमागील नैतिक प्रश्न आधीपासूनचअत्यंत स्पष्ट आहेत. रोबोट एका रात्रीत अचानक संपूर्णजगावर ताबा मिळवतील, हा खरा धोका नाही. खरा धोकात्या मानवी सवयी आणि जीवनपद्धती हळूहळू नष्टहोण्याचा आहे. यामध्ये कुणाची तरी काळजी घेणे, हरणेआणि ती हार स्वीकारणे, जिंकल्यावर उगीच गाजावाजान करणे, एम्पथी आणि विश्वासासाठी जगणे, सुख-दुःखअनुभवणे, गर्व आणि मत्सरापासून दूर राहणे, स्वतःवरलक्ष ठेवणे आणि कृतज्ञ राहणे यांचा समावेश होतो.केंब्रिजने ‘ह्यूमन’ची निवड केली आहे. कोणतीहीडिक्शनरी एखादा शब्द उगाचच निवडत नाही; तर ती त्याकाळाचा आवाज ऐकते आणि ऐकवते. सोबतच त्याचाअर्थही स्पष्टपणे समजावून सांगते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- पुणे: खडकवासला-फुरसुंगी बोगद्यातून २० हजार कोटींची जमीन मोकळी होणार! पाणी बचतीसह वाहतुकीलाही मिळणार मोठी चालना
महाराष्ट्र
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- कोल्हापूर: त्रिपुरारी पहाट! ५१ हजार दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट; बोचऱ्या थंडीतही कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त सहभाग
गुन्हा
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात

























Subscribe to my channel



