
Pune : रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत भर; रायगड कनेक्शन उघड, ‘शिवनिका’ ट्रस्टवर SIT ची नजर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे आधीच अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या समस्यांमध्ये आता आणखी भर पडताना दिसत आहे. या प्रकरणामुळे त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता रायगडमधील त्यांच्या व्यावसायिक संबंधांचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांना आता काही प्रमाणात पुष्टी मिळताना दिसत आहे. रायगडमधील रोहा येथे निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘कर्मा कन्स्ट्रक्शन LLP’च्या माध्यमातून रोठ खुर्द येथे उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारतीवर अनधिकृत बांधकामाचे आरोप करण्यात आले आहेत. भाजप अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी याप्रकरणी माणगाव न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या व्यावसायिक संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, आकाश चौधरी यांच्या नावावर अनेक कंपन्यांची नोंदणी असल्याची माहितीही तपासातून पुढे आली आहे. यात ओशन पर्ल मेरिटाइम प्रा. लि., कोलाड आणि कर्जत रिव्हर राफ्टिंग, गीता ॲग्रो अँड इन्फ्रा प्रा. लि., FL3 हॉस्पिटॅलिटी आणि रॉक हिल ॲडव्हेंचर रिसॉर्ट यांसारख्या व्यवसायांचा समावेश आहे.
दुसरीकडे, अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) आता ‘शिवनिका’ ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांकडे लक्ष केंद्रित केले आहे. या संस्थेच्या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, संबंधित आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
या घडामोडींमुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या असून त्या कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. पुण्यात आज सकाळी ११ वाजता गुलाबो गँगकडून रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असून, तीव्र निदर्शने होण्याची शक्यता आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



