पूर्वी भारतीय बाजारपेठ स्वतःमध्येच बंदिस्त आणिएकाकी असायची, पण आता ती जागतिक व्यापाराचीप्रणेती बनत चालली आहे. भारतीय बाजारपेठेचे हेपरिवर्तन कदाचित 21 व्या शतकातील जागतिकअर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा संरचनात्मक बदलआहे. देशाने बंदिस्त, बचावात्मक आर्थिक भूमिका सोडूनबाह्य जगाकडे लक्ष ठेवणारा, जागतिक स्तरावर आक्रमकदृष्टिकोन स्वीकारला आहे. जो देश कधीकाळीजागतिकीकरणात संकोचाने सहभागी होत असे, तो आताजागतिक पुरवठा साखळीला आकार देणारी एकआत्मविश्वासपूर्ण शक्ती बनला आहे. अनेक दशके भारतीय बाजारपेठ‘लायसन्स-परमिट-कोटा राज’ म्हणून ओळखली जातहोती. ही नोकरशाहीची पकड आणि प्रचंड करांचीगुदमरून टाकणारी व्यवस्था होती, जी देशांतर्गत उद्योगांना परदेशी भांडवलाच्या कथित शोषणापासून वाचवण्यासाठी तयार केली गेली होती. स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांशकाळ भारताची आर्थिक रणनीती आत्मनिर्भरता, आयातपर्याय आणि जागतिक बाजारपेठेबद्दलची तीव्र शंका यावर आधारित होती. या दृष्टिकोनामुळे तांत्रिक साचलेपणा आणि भारताचीआर्थिक क्षमता व तिची कामगिरी यातील सातत्यानेवाढणारी दरी निर्माण झाली. अर्थतज्ज्ञ राज कृष्ण यांनी तरयाला ‘हिंदू विकास दर’ असे नाव दिले होते. आपलीअर्थव्यवस्था लोकसंख्या वाढ आणि वाढत्या गरजांशीजुळवून घेण्यासाठी सतत संघर्ष करत राहिली. 1991 च्या उदारीकरणाने या परिवर्तनाची सुरुवात केली.भारताने जागतिक अर्थव्यवस्थेपासून स्वतःचा बचावकरण्याऐवजी त्यात हिरिरीने भाग घेण्यापर्यंत आणि त्यातस्पर्धा करण्यापर्यंत मजल मारली. हा बदल आर्थिकदृष्ट्याजेवढा महत्त्वाचा होता, तेवढेच त्याचे मानसिक महत्त्वहीहोते. खुलेपणाच्या शक्यतांचा स्वीकार करण्यासाठीभारताला आपली चिंता, असुरक्षिततेची भावना सोडूनद्यावी लागली. काळानुसार, जागतिक व्यापार,भांडवलाचा ओघ, तंत्रज्ञान नेटवर्कमधीलएकत्रीकरणामुळे विकासाचा वेग, शहरीकरणाचाआकृतीबंध, उद्योजकीय संस्कृतीला नवा आकारमिळाला. पण ही कथा इथेच संपत नाही. 2026 च्या भारतानेआपल्या बेड्या तोडून जगातील सर्वात खुली आणिउदारीकृत उदयोन्मुख अर्थव्यवस्था बनण्याचा मानमिळवला आहे. हे परिवर्तन एका मूलभूत अंतर्दृष्टीतूननिर्माण झाले आहे आणि ती म्हणजे, एका डिजिटलीकृतजगात खरे आर्थिक सार्वभौमत्व एकाकी राहण्यातून नाही,तर जोडले जाण्यातून मिळते. 1991 च्या सुरुवातीच्यासुधारणांनी दरवाजे उघडण्यास सुरुवात केली होती, तरभारताने गेल्या काही वर्षांत हे अडथळे दूर केले आहेत. आता भारत केवळ एक किरकोळ खेळाडू राहिलानसून, जागतिक आर्थिक प्रवाहात तो केंद्रस्थानी आहे.सेवांची निर्यात, डिजिटल क्षमता आणि उत्पादनातीलमहत्त्वाकांक्षा यामुळे आपण स्वतःला अशा देशाच्या रूपातप्रस्थापित केले आहे, ज्याचे आर्थिक निर्णय आपल्यासीमेपलीकडेही दूरवर परिणाम करतात. बहुपक्षीय मंचांवरभारताने यूएई, ओमान, ऑस्ट्रेलिया, यूके आणि ईयू(युरोपियन युनियन) यांच्यासोबत ऐतिहासिक व्यापकआर्थिक भागीदारी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.याशिवाय, न्यूझीलंड आणि अमेरिका या दोन्ही देशांनीतत्त्वतः करारांची घोषणा केली आहे. या बदलाच्यामुळाशी भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भरता’ या मंत्राची एकसूक्ष्म फेरव्याख्या देखील आहे. भारताच्या नेत्यांना आतासमजले आहे की, आत्मनिर्भरता इतरांपासून वेगळे राहूननव्हे, तर जागतिक स्तरावर जोडले जाऊनही साध्य करतायेऊ शकते. भारत आता परदेशी भांडवलाला घाबरत नाहीआणि पूर्व आशियातील पारंपरिक उत्पादन केंद्रांना प्रमुखपर्याय म्हणून तो अत्यंत उत्सुकतेने स्पर्धा करत आहे. अशाप्रकारे, भारताच्या या खुलेपणाला आताधोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. जे कधीकाळीदेशांतर्गत सुधारणांचे उद्दिष्ट वाटत होते, ती आता एकजागतिक संधी बनली आहे. उदयोन्मुख डिजिटलसार्वजनिक पायाभूत सुविधा आणि नवीन व्यापार करारयातील समन्वय अशा भविष्याकडे निर्देश करतो, जिथेभारत केवळ वस्तूंचीच नव्हे, तर जगाच्या डिजिटलआर्किटेक्चरचीही निर्यात करेल. एक मोठी, स्थिरलोकशाही, तरुण मनुष्यबळ, सुधारत असलेल्या पायाभूतसुविधा आणि अधिक पारदर्शकतेकडे वाटचाल करणारेनियामक वातावरण यांचा संगम- भारताला केवळ चीनलापर्याय बनवत नाही, तर बहुध्रुवीय पुरवठा-साखळीच्यासंरचनेत एक महत्त्वाचे केंद्रही बनवतो.
(@प्रोजेक्ट सिंडिकेट) विदेशी भांडवलाला विरोध व ते आकर्षितकरण्यापर्यंत; देशांतर्गत अक्षमतेपासून तेजागतिक स्पर्धात्मकतेपर्यंत- आपलाप्रवास स्पष्ट आहे. भारत आता जागतिकव्यवस्थेत मूकदर्शक राहिला नाही, तरआपल्या भविष्याचा निर्माता बनला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




