आपण सर्वांनी लहानपणी “बेंचवर उभे राहा’ हे नक्कीच ऐकले असेल. ही सामान्य शिक्षा होती. यापेक्षा थोडी कडक शिक्षा म्हणजे, ‘क्लासच्या बाहेर उभे राहा.’ विशेषतः, जेव्हा आपण त्या तासाच्या शिक्षकांना जास्त त्रास द्यायचो. दुसऱ्या शिक्षेत वाईट तेव्हा व्हायचे, जेव्हा तुम्ही क्लासच्या बाहेर उभे असता आणि मुख्याध्यापक राउंडवर येतात. जेव्हा मला अशी शिक्षा मिळाली तेव्हा दोन वेळा टॉयलेटमध्ये लपावे लागले. तिसरी आणि सर्वात वाईट शिक्षा, ज्याची मला नेहमी भीती वाटायची, ती म्हणजे “क्लासनंतर मुख्याध्यापकांच्या खोलीत भेटणे.’’’’ मला अशी शिक्षा कधीच नको असायची, कारण मुख्याध्यापक माझ्या वडिलांना ओळखायचे आणि त्यांच्या टेबलवर फोन असायचा. ते नेहमी वडिलांच्या ऑफिसमध्ये फोन करण्याची धमकी द्यायचे. त्या दिवशी घरी परतल्यावर मी शिक्षेबद्दल काहीही बोलत नसे. ओव्हरअॅक्टिंग करायचो. यामुळे आईसमोर माझे बिंग फुटायचे आणि शेवटी ती विचारायचीच की, “आज क्लासमध्ये काही शिक्षा मिळाली का?’ कधी मी नकार द्यायचो, ज्याकडे ती दुर्लक्ष करायची अन् कधी मान्य करायचो, पण तिच्याकडून वचन घ्यायचो की ती बाबांना सांगणार नाही. हळूहळू या शिक्षा बदलून ‘अ नोट टू पॅरेंट्स’पर्यंत पोहोचल्या. यात विद्यार्थ्याला पालकांची सही आणावी लागायची, किंवा ‘उद्या वडिलांना सोबत घेऊन ये’ असे लिहिलेले असायचे. माझी मुलगी शाळेतून पासआऊट होईपर्यंत मी हे सर्व पाहिले. अर्थात, तिला माझ्या विपरीत कधीही शिक्षा मिळाली नाही. ती तिच्या आईसारखीच समजूतदार होती. यानंतर शाळांमधील शिक्षा कशा झाल्या, हे मला अमेरिकेला जाईपर्यंत माहीत नव्हते. तिथे काही शाळांमध्ये कपाटापेक्षा दुप्पट मोठ्या खोल्या असतात आणि त्यांना वेगवेगळ्या नावांनी बोलावले जाते. ते मुलांना स्कूल अॅडमिनिस्ट्रेटरच्या केबिनमागील त्या खोलीत पाठवतात आणि त्या जागेला ‘काम डाऊन रूम’ म्हणतात. काही जण त्याला ‘चिल रूम’तर काही “रिसेट स्पेस’ किंवा ‘सेल्फ-मॅनेजमेंट रूम’ म्हणतात. काही शाळा ‘रेग्युलेशन स्टेशन’ म्हणतात. पालकांनी या आयसोलेशन पनिशमेंटवर प्रश्न उपस्थित केले, तर शाळा त्यांना समजावून सांगतात की ही ‘थिंकिंग रूम’आहे- असा शब्द, जो पालकांना सखोल विचार करण्यापासून रोखतो. विशेष म्हणजे, आता पालकांकडे असे 45 वेगवेगळे शब्द आहेत, ज्यांचा वापर देशभरातील शाळा करतात. ते वेलनेस’, सेल्फ सपोर्ट, फोकस आणि माइंडफुलनेस यासारखे शब्द वापरतात. तर पालक विचार करत आहेत की अशा शब्दांचा वापर कसा केला जाऊ शकतो, जेव्हा ही जागा कपाटासारखी छोटी आणि भीतिदायक आहे, तिथे गैरवर्तन केल्यावर क्लासमधून काढलेल्या मुलाला ठेवले जाते. माझ्या प्रवासादरम्यान मी हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या आसपास बराच वेळ घालवला, जी मॅसॅच्युसेट्स राज्यात आहे. या राज्यातील शाळांना पालकांना हे सांगण्याची गरज नसते की त्यांच्या पाल्याला कधी ‘टाइमआऊट रूम’मध्ये ठेवले गेले. ही प्रथा आजही सुरू आहे, तर पालकांनी जोर देऊन सांगितले आहे की यामुळे मुलांना मोठा धक्का बसतो. अनेकदा मुले भीतीने मलमूत्र विसर्जन करतात, तेव्हा जाऊन पालकांना शिक्षेबद्दल समजते. एका स्थानिक टीव्ही न्यूज स्टोरीमध्ये सांगितले गेले की 5 वर्षांचा एक ऑटिस्टिक मुलगा 28 मिनिटांच्या शिक्षेत त्या खोलीतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत होता. हे प्रकरण पालकांमध्ये चर्चेचा मोठा विषय बनले होते. मीका कॅमिली नावाच्या आईने 8 वर्षांच्या मुलाचे रेकॉर्ड तपासले तेव्हा त्यात कमी उपस्थिती आणि हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डरच्या नोंदी होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, त्यात मुलाला दोन वेळा ‘टाइमआऊट रूम’मध्ये पाठवल्याचाही उल्लेख होता. आता ती मुलाच्या रागीट स्वभावासाठी शाळेला दोषी मानते. अनेक पालक म्हणतात की हा तुरुंग आहे. फंडा हा आहे की, युवा पिढी छोट्या-छोट्या गोष्टींवर खूप जास्त संवेदनशील आणि चिडचिडी होत चालली आहे, त्यामुळे शाळांना शिक्षेबाबत पुन्हा विचार करावा लागेल. कठोर शिक्षांना ‘टाइमआऊट रूम’ सारख्या गोड शब्दांत मांडल्याने कदाचित मुलांची संवेदनशीलता शांत केली जाऊ शकत नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




