हे ही खरंच आहे, माणूस हा इतर कशाच्या आधारावर जगत नसून केवळ आशेवर जगतो. आयुष्यात सतत आशेचे नवीन किरण उगवत राहतात आणि पुढे जगायला भाग पडतात. ते त्याला जगण्याची एक दिशा देतात. जगायला लावणारी आशा कधी उत्कर्ष वाढवणारी तर मात्र कधी केवळ लोभस अशी असते. आता उन्हाळा ओसरत आला. परत एकदा गतवर्षाप्रमाणे माणूस धरतीकडे एका आशेने पाहतो आहे. धरती मात्र कधी निरभ्र तर कधी ढगाळलेल्या आकाशाकडे सतत टक लावून पाहत आहे. तिलाही आशा आहे, आस आहे. धरती आकाशाकडे आशेने पाहत असताना माणूस मात्र तिच्याकडे स्वार्थाने पाहतो आणि धरतीच्या मनाचा त्याने कधी विचारही केला नाही. तर या धरतीला कशाची बरी आशा असेल? तिला हिरवा शालू चुडे नेसवणाऱ्या वरुणराजाची तर आशा नक्कीच असणार! यात तिळमात्र शंका नाही. पावसाच्या आगमनासाठी आसक्त झालेली धरती पाहिली की मनात काहूर माजतं. वरूणराजाच्या आगमनाच्या आशेने धरती मनातून फुललेली, आठवणीने बेहोश होऊन आतून भिजून चिंब झालेली दिसते तर तो आल्यानंतर त्याच्या मस्तीने धुंद झालेली माती डोळ्यातून सुटते थोडीच. हा पाऊस प्रणयानं, भुकेने, प्रेमानं कोसळताना भोळ्या मातीत एक प्रकारचा सुगंध पेरून सुरुवात करतो. या सुगंधाने धरतीचं, निसर्गाचं, वाऱ्याचं निसर्गात असलेल्या साऱ्यांचं मन अगदी फुलून येतं, देहभान विसरून जातं. आणि हा मातीचा सुगंध! ही तर निसर्गाची अनमोल देणगी. या सुगंधी वाऱ्याच्या गंध लहरी तुझ्यापर्यंत, माझ्यापर्यंत, त्याच्यापर्यंत, तिच्यापर्यंत मनात खोलवर भिडल्या म्हणजे सर्व काही विसरून वेगळ्या जगात गेल्याचा भास होतो. यावेळी या धरतीला किती आनंद वाटत असेल? त्या भावना आपल्याला तिच्या मनात शिरून विचार केल्याशिवाय कळणार तरी कशा? तेही खरंच आहे. ज्याचा विचार केला, मनाच्या भोवती अल्हाद विळखा घातला, काळजात शिरायचा प्रयत्न केला त्याच्याच भावना कळत असतात. पाऊस चालू झाला म्हणजे थुई थुई नाचणाऱ्या थेंबांच्या कोमल स्वरांनी तर उडणाऱ्या लाख लाख तृषारांनी धरती आपला आनंद व्यक्त करत असते. आनंद व्यक्त करणे हे मनाच्या पावित्र्याचं लक्षण असतं. पावसाच्या थेंबांची गर्दी कधी कधी तिला सहनही होत नसेल. कारण गर्दी आणि आवाज कोमल भावनांच्या मारक असतात. हा मातीचा सुगंध निर्माण होतो खरा अन् आवश्यक ही असतो. पण त्याला निर्माण करण्यासाठी धरतीला किती कष्ट सोसावे लागतात? आपण कधी हा विचारही केला नाही. चार एक महिनाभर उन्हाळ्याचा दाह सहन केलेला. पुढे रात्रभर वारे पन्नास बावन्न मैलाच्या वेगाने वाहतात. कधी ते ढगांना पळवून लावून आसक्त धरतीला हिरमुसले करतात. हा सुरवातीला येणारा पाऊस माडाची झाडं उलटी सुलटी करतो तर कधी झिंज्या पसरून अंगात आलेल्या माणसांसारखी बेभान होऊन नाचणारी, पिंगा घालणारी जंगलं ही दाखवतो. मात्र या सुगंधानं वातावरण चांगलंच उत्साहवर्धक होतं. याच वेळी क्षणात रागात असलेली विध्वंस बनलेली मनं पार बदलूनही जातात. मात्र एखाद्याला हा मातीचा सुगंध कोणाच्यातरी आठवणीने हैराण व्याकुळ करून सोडतो. ही तगमग ज्याच्या त्याच्या मनाला हेलावून सोडून काळजाला भिडलेली असते. हे नैसर्गिक सुगंधाचं सामर्थ्य आजकालच्या धुरकट, रोगट, भौतिक गंधात कुठलं असणार? कधी व्याकुळ झालेली धरती कदाचित म्हणतही असेल, धुसरं धुक्यातून लहरी वरती निरोप दे तु वायु संगे व्याकुळले तव आगमनाला स्वप्न असे नयनी रंगे खरंच मानवी स्वभावाचं अनुरागात रूपांतर करणाऱ्या, जगण्याचा उल्हास वाढवणाऱ्या या मातीच्या सुगंधाला जपून, टिकवून, हृदयात साठवून ठेवण्याची क्षमता धरतीत मातीत यावी अशी प्रार्थना करायला काय हरकत आहे? कधी कधी असाच हा मातीचा सुगंध मनाला हेलावणी देऊन जातो अन् देह फुलून येतो. वेडे झालेले मन धरतीकडे पाहून म्हणू लागते, जललहरी अन् पाऊस धारा फुलवी मज हा सुगंध सारा सुगंध मातीचा मन मोही वेडी झाले रे तुझं सह मी ही ------------ (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



