नागपूर: एक अतिशय खळबळजनक आणि चिंताजनक वृत्त समोर आले आहे. एका उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्याची १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवारपासून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावरून नागपूर पोलीस दलात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, संबंधित उच्चपदस्थ अधिकारी हे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांची १६ वर्षीय मुलगी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे. रविवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तिने आपल्या आईला मी मैत्रिणीच्या घरी जात आहे, असे सांगितले आणि ती घरून बाहेर पडली. मात्र, दुपारपर्यंत ती घरी परतली नाही. दुपारी चार वाजेपर्यंत ती घरी न आल्यामुळे तिच्या आईने तिच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी त्या मुलीने आपण मैत्रिणीकडे असून लवकरच घरी परत येत असल्याचे आईला सांगितले.
परंतु, त्यानंतरही ती घरी परतली नाही. संध्याकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्याने पालकांनी पुन्हा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा मोबाईल फोन पूर्णपणे बंद येत होता. यामुळे चिंतातूर झालेल्या आई-वडिलांनी तिच्या मैत्रिणी, नातेवाईक तसेच इतर ओळखीच्या लोकांकडे तिचा कसून शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. आपली मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांच्या पायाखालची वाळू सरकली.
अखेर या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३७ (२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनी सुरक्षितपणे मिळावी यासाठी नागपूर पोलिसांची विशेष पथके (स्पेशल टाईम्स/युनिट्स) तैनात करण्यात आली असून, पोलीस विविध बाजूंनी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून नागपूर शहरात एकच चर्चा रंगली आहे.
शहर
- पुणे: 'सिंहगड' संस्थेला मोठा दणका! कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रकरणी सात महाविद्यालयांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती; तीन वर्षांसाठी कारभार शासनाच्या ताब्यात
- मुंबई: भाजपच्या जाळ्यात अजिबात अडकू नका!"; छठपूजेच्या वादावरून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी संघर्ष घडवल्याचा गंभीर आरोप
- पुणे: गॅस तुटवडा १४ किलोची गॅस जोडणी बंद; १० किलोचा १६८० रुपयांचा महागडा पर्याय नागरिकांच्या माथी!
- छत्रपती संभाजीनगर: मध्यरात्रीचा थरार संजय शिरसाटांच्या घरावर दगड आणि बाटल्याफेक, तिघे तरुण अटकेत
महाराष्ट्र
- हिंगोली: सणासुदीचा आनंद क्षणात राखेत विरला! हिंगोलीच्या आखाडा बाळापूर बसस्थानक परिसरात भीषण आग; ५ दुकाने बेचिराख, लाखोंचे नुकसान
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे भीषण अपघात! आंजणारी पुलाजवळ ट्रकची खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक; २३ प्रवासी जखमी, ४ गंभीर
- पुणे: 'सिंहगड' संस्थेला मोठा दणका! कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रकरणी सात महाविद्यालयांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती; तीन वर्षांसाठी कारभार शासनाच्या ताब्यात
गुन्हा
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




