एक राजनैतिक अधिकारी म्हणून मी परदेशात कार्यरत होतो आणि जगभ्रमंती केली आहे. माझ्या पासपोर्टवर मला भारत-गणराज्याचा नागरिक, एक उदयोन्मुख शक्ती आणि महान संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून संबोधले गेले आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. म्हणूनच, परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच जेव्हा असे म्हटले की, पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, तेव्हा मी गोंधळून गेलो. सरकारची स्वतःची काही कारणे असू शकतात, पण अनेक दशकांपासून भारतीयांची अशी समज आहे की पासपोर्ट ही त्यांच्या नागरिकत्वाची अधिकृत पुष्टी आहे. पासपोर्ट मिळवण्याच्या प्रक्रियेआधी सखोल चौकशी केली जाते. अर्जदाराला कागदपत्रे सादर करावी लागतात, ओळख पटवावी लागते, निवासाचा पुरावा द्यावा लागतो आणि पोलिस पडताळणीतून जावे लागते. पासपोर्ट केवळ एखादी व्यक्ती परदेशात जाऊ इच्छिते म्हणून दिला जात नाही, तर राज्यसंस्थेचे समाधान होते की अर्जदार भारतीय नागरिक आहे, म्हणून तो दिला जातो. पासपोर्ट कायद्याच्या कलम 6(2)(ए) मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, पासपोर्ट केवळ भारताच्या नागरिकालाच दिला जाऊ शकतो. या दस्तऐवजाचे भावनिक महत्त्व त्याच्या प्रशासकीय उपयुक्ततेपेक्षाही मोठे होते. ते व्यक्ती आणि देश यांच्यातील नात्याचे प्रतीक होते. परदेशात जाणाऱ्या भारतीयांसाठी ही केवळ एक पुस्तिका नव्हती, तर ती ओळख व आपलेपणाची घोषणा होती. हे खरे आहे की, माहिती लपवून, कागदपत्रांमध्ये फेरफार करून किंवा खोटी माहिती देऊन काही लोक चुकीच्या मार्गाने पासपोर्ट मिळवू शकतात. अशा स्थितीत राज्यसंस्थेला पासपोर्ट रद्द करण्याचा आणि दोषीवर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण, कायदेशीर प्रक्रियेद्वारे मिळालेला वैध पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा आहे, ही धारणा या कारणास्तव नाकारता कामा नये. मतदार ओळखपत्रही चुकीच्या पद्धतीने मिळवता येऊ शकते. रेशन कार्डातही फेरफार होऊ शकतो. आधार कार्डाचाही दुरुपयोग होऊ शकतो. मालमत्तेच्या कागदपत्रांतही घोटाळे करता येतात. भारतातील सध्याची कागदपत्रांची स्थिती पाहता हा प्रश्न अधिक चिंतेचा ठरतो. आधार नागरिकत्वाचा पुरावा नाही. मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाही. रेशन कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही. जन्मदाखल्यांनाही अनेकदा प्रक्रियात्मक कारणांवरून आव्हान दिले जाते. आता जर पासपोर्टही नागरिकत्वाचा पुरावा नसेल, तर नागरिकत्वाचा खरा पुरावा काय, हा प्रश्न निर्माण होतो. कोणतेही आधुनिक राष्ट्र गोंधळाच्या आधारावर चालू शकत नाही. नागरिकत्व ही काही हवेतली गोष्ट नाही. याच गोष्टीवर शेवटी सर्व घटनात्मक अधिकार अवलंबून असतात. मतदानाचा अधिकार वापरणे, कायदेशीर संरक्षणाची मागणी करणे, सरकारी लाभ मिळवणे किंवा संविधानाने दिलेले अधिकार उपभोगण्यापूर्वी, व्यक्तीने नागरिक म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. जर कोणतीही कागदपत्रे ही स्थिती ठामपणे सिद्ध करत नसतील, तर सर्व भार व्यक्तीवर येऊन पडतो. प्रत्यक्षात राज्यसंस्थेने स्वतःच्या संस्था आणि कागदपत्रांच्या माध्यमातून नागरिकाचे नागरिकत्व सिद्ध करायला हवे होते; परंतु त्याऐवजी, नागरिक स्वतः या देशाचा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला वारंवार भाग पाडले जाते. जेव्हा राज्यसंस्था स्वतः कागदपत्रे जारी करूनही नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, तेव्हा नागरिक संभ्रमावस्थेत जातो. त्याच्याकडे कागदपत्रे असूनही ती अपुरी ठरतात. तो नियमांचे पालन करतो, पण त्याला कोणतीही शाश्वती मिळत नाही. नागरिकत्व जर सतत वादाचा विषय बनून राहिले, तर अधिकाऱ्यांना अतिरिक्त पुरावे मागण्याचे जास्तीचे अधिकार मिळतात. नागरिक मनमानी अर्थ आणि नोकरशाहीच्या समाधानावर अवलंबून राहतात. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या अनेक देशांत पासपोर्टला नागरिकत्वाचा भक्कम पुरावा मानले जाते, कारण ते देण्यापूर्वी नागरिकत्वाची पडताळणी केली जाते. यावरचा खरा उपाय म्हणजे दस्तऐवज देण्यापूर्वीची तपासणी प्रक्रिया अधिक कडक करणे, पडताळणी यंत्रणेत सुधारणा करणे, विविध डेटाबेस एकमेकांना जोडणे आणि फसवणूक करणाऱ्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद करणे हा आहे. या वादाच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचा प्रश्न आहे: लोकशाहीमध्ये नागरिकाने वैधतेच्या गृहीतकावर जगावे की संशयाच्या? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) नागरिकत्व जर सतत वादाचा विषय बनून राहिले, तर अधिकांऱ्यांना अतिरिक्त पुरावे मागण्याचे जास्तीचे अधिकार मिळतात. मग नागरिक मनमानी अर्थ आणि नोकरशाहीच्या समाधानावर अवलंबून राहतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




