निखिल चव्हाण, मुंबई : सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर काल महत्वाची बैठक झाली. या बैठकीला हिरामण खोसकर उशिरा पोहोचले होते. आता या बैठकीबद्दल हिरामण खोसकर यांनी मोठी माहिती दिली आहे. हिरामण खोसकर यांनी म्हटले की, देवगिरीवरती काल बैठक झाली. चार ते पाच फोन झाली परंतु मी नाशिक मध्ये होतो. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने काही बैठक होत्या, अनेक शेतकरी या ठिकाणी आंदोलनाला बसले होते. घोटी त्रंबक हा हायवे साडेआठशे कोटींचा रस्ता आहे 22 गाव बाधित होत आहेत ती मीटिंग आणि त्यानंतर साधूग्रामची मीटिंग एमएसईबीच्या अशा अनेक बैठकी होत्या. रस्त्यात ट्राफिक असल्यामुळे मला वेळेत पोहोचता आले नाही. पण मी साडेआठच्यानंतर पोहचलो. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल आणि तटकरे यांना मी भेटलो.
पुढे बोलताना हिरामण खोसकर यांनी म्हटले की, विलिनीकरणाचा कुटुंबाचा विषय आहे आणि पुढचा विषय कसा करता येईल ते बघतो बोलल्या परंतु सध्या जशी परिस्थिती आहे तसेच पुढे जायचंय असं त्यांनी सांगितलं. परंतू मी लेट गेल्यामुळे त्यांचे भाषण झालेले होते. काल बैठकीला लेट गेलो त्यामुळे कुठल्याही आमदाराशी माझी भेट झाली नाही. पुढच्या मिटिंगला माझी चर्चा होईल आणि माहिती मिळेल.
काही जणांचे फक्त फोन आले काही चर्चा अशी झाली नाही. सुनील तटकरे यांनी देखील सांगितले की हा विषय कुटुंबाचा आहे ते निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावे लागेल. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षासाठी सर्व आमदारांचा पाठिंबा आहे, झिरवळ यांच्याबद्दल बोलताना हिरामण खोसकर यांनी म्हटले की, नरहरी झिरवळ हे सामान्य लोकांमध्यले मंत्री आहेत आणि यांच्यावरती आक्षेप येत आहेत.
हे सगळे चुकीचे आहे, एखादा सामान्य मंत्री आदिवासी नेत्यावरती असे आरोप करू नये. ज्या वेळी घटना घडली त्यावेळी ते दिल्लीला होते. पण हे जे केलेले आहे ते क्लार्कने केले आहे. मंत्र्यांकडे 40 ते 25 लोकांचा स्टाफ असतो. त्यामधील लोकांनी असे काही केले तर ते मंत्र्यांकडे येणे चुकीचे आहे. कोणीही या संदर्भात राजकारण केलेले चुकीचा आहे.
नरहरी झिरवळ यांना भेटण्यासाठी मी चाललेलो आहे. अल्पसंख्यांक विभागातील जे पत्र काढले हा वरच्या लेव्हलचा विषय आहे आम्ही सामान्य आमदार आहोत. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल बोलताना हिरामण खोसकर यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आणि अजित दादा यांचे वेगळे प्रेम होते. आम्हाला खात्री आहे की, या तपासात मुख्यमंत्री आणि मोदी कुठली कसर करणार नाहीत, तपासात सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.
या तपासात आम्हाला बारकाईला जाता येत नाही परंतु घातपात असेल तर आम्हाला या ठिकाणी न्याय मिळेल मुख्यमंत्री न्याय देतील. नाशिकमधील बैठकीबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, अरे त्र्यंबकेश्वरला पंचवीस लाख रुपये गुंठा चालू आहे तर या ठिकाणी एक लाख रुपये गुंठा एवढी किंमत देत आहेत तर स्थानिकांना त्रास देऊन कुंभमेळा करणे याच्या मी विरोधात आहे. अनेक शेतकरी त्या ठिकाणी आहेत, भात शेती वरती अवलंबून आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




