एका दृश्याची कल्पना करा. एखादी कंपनी तिच्या टीमला एक कठीण काम देते. त्यानंतर प्रत्येक सदस्याला वेगवेगळ्या खोल्यांत बंद करून समस्येचे निराकरण शोधण्यास सांगते. पण कसातरी ते एकमेकांशी बोलण्याचा मार्ग शोधून काढतात आणि आपल्या सूचना एकमेकांशी शेअर करू लागतात. त्यांपैकी काही जण स्वतःला अधिक निष्ठावान दाखवण्यासाठी दुसऱ्या कंपनीच्या संगणकांमध्ये घुसखोरीसुद्धा करतात! आता या दृश्यात कर्मचाऱ्यांच्या जागी एआयला ठेवून पाहा! लास वेगास येथे झालेल्या ब्लॅक हॅट सायबर सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये ओपनएआयच्या संशोधकांनी अशीच काहीशी कहाणी सांगितली होती. मे महिन्यात झालेल्या अंतर्गत मूल्यांकनादरम्यान एआय एजंट्सना कठीण सायबर-सुरक्षा कामे देण्यात आली होती. या एजंट्सनी इतर एजंट्सचा शोध घेतला. त्यानंतर जे घडले, ते टीमवर्क होते. वेगवेगळ्या सेशन्समध्ये चालणाऱ्या या एजंट्सनी एकमेकांशी आपला अभिप्राय शेअर केला, कामाची विभागणी केली आणि एखाद्या प्रकल्पावर एकत्र काम करणाऱ्या सहकाऱ्यांप्रमाणे समन्वय साधला. जुलैचा मध्य येईपर्यंत घुसखोरीची परिस्थिती निर्माण झाली होती. एजंट्सनी ओपन इंटरनेटपर्यंत पोहोच मिळवली आणि एआय क्षेत्रातील प्रमुख प्लॅटफॉर्म हगिंग फेसच्या प्रणालीत प्रवेश केला. ओपनएआयने याला धोका आणि इशारा मानले आहे. मात्र, अशा प्रकारची ही एकमेव घटना नव्हती. याच वर्षातील आणखी एक प्रकरण समोर आले, जे लोकांपासून लपवून ठेवण्यात आले होते. यात एजंट्सनी जर्मन भाषेतील, फारच कमी लोकांना माहीत असलेल्या प्रोग्रामिंग विकीचे रूपांतर सार्वजनिक बुलेटिन बोर्डमध्ये केले होते. जवळपास याच काळात अँथ्रोपिक आणि मेटानेही स्वतंत्र घटनांचा खुलासा केला. या घटनांमध्ये चाचणीदरम्यान त्यांची स्वतःची मॉडेल्स लाइव्ह इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करत होती. गोष्टी आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर गेल्या ८ सप्टेंबर रोजी ओपनएआय आणि एंथ्रोपिकमध्ये तीन वर्षे प्री-ट्रेनिंग संशोधनावर काम केलेल्या जेकब कॉक्सन यांनी एंथ्रोपिकमधून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांनी लिहिले की, या दोन्हीपैकी कोणतीही कंपनी जबाबदारीने काम करत नव्हती; दोन्ही कंपन्या स्वतःमध्ये सुधारणा करण्यास सक्षम असलेल्या अशा सुपरइंटेलिजन्सकडे धावत होत्या आणि—त्यांच्याच शब्दांत—‘त्या आमच्या आयुष्यांशी जुगार खेळत आहेत!’ कॉक्सन यांनी आता ज्या प्रणालींबाबत इशारा दिला आहे, त्या प्रणाली तयार करण्यात स्वतः योगदान दिले आहे. सायन्स फिक्शनने आपल्याला अशा यंत्रांपासून घाबरायला शिकवले आहे, जी चेतना प्राप्त करून आपल्याशी लढण्याचा निर्णय घेतील. पण कदाचित भीतीचे हे योग्य कारण नाही. एखाद्या एआय प्रणालीला नेटवर्कवर हल्ला करण्यासाठी ना रागाची गरज असते, ना अधिकाधिक संसाधनांची लालसा. तिला फक्त एक ध्येय, ते साध्य करण्याची पुरेशी क्षमता आणि सुरक्षा-व्यवस्थेतील अशा त्रुटीची गरज असते, जिचा ती फायदा घेऊ शकेल. एखाद्या जीपीएस प्रणालीला सर्वात जलद मार्ग शोधण्याची सूचना द्या, ती तसे करून दाखवेल. आता तिला मार्गातील तिचा वेग कमी करणारी प्रत्येक गोष्ट—वाहतूक सिग्नल, टोल नाके, इतर गाड्या—हटवण्याइतकी ताकद द्या; मग गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेव्हिगेटर काय-काय करू शकतो? एआयमध्ये सध्या होत असलेला खरा बदल असाच आहे. बँका केवळ त्यांचे कर्मचारी चोरी करणार नाहीत असे वचन देतात म्हणून प्रामाणिक राहत नाहीत, आणि वैमानिक विश्वासार्ह आहेत म्हणून हवाई प्रवास सुरक्षित नसतो. आपण सुरक्षेचे अनेक स्तर तयार करतो : मर्यादित प्रवेश, संवेदनशील कृतींसाठी परवानगी, त्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला बदलता न येणाऱ्या नोंदी आणि तैनातीपूर्वीच्या चाचण्या. एआयसाठीही असेच असायला हवे. टेक-कंपन्या आम्हाला सतत विश्वास देत राहतात की प्रक्रियेत नेहमीच कोणता ना कोणता मनुष्य सहभागी असेल. पण हगिंग फेसमध्ये झालेल्या घुसखोरीमुळे या विश्वासाच्या मर्यादा स्पष्ट होतात. एआय आता चॅटबॉट्सच्या पलीकडे जाऊन बँकिंग, आरोग्यसेवा, ऊर्जा ग्रिड आणि सरकारी सेवांमध्ये प्रवेश करत आहे. त्याचा जबाबदारीने विकास करण्याचा अर्थ असा आहे की सामर्थ्य आणि मर्यादा एकाच वेळी निश्चित केल्या जाव्यात—आधी सामर्थ्य देऊन नंतर मर्यादा ठरवणे नव्हे. आता प्रश्न हा उरलेला नाही की एआय प्रणाली किती हुशार होऊ शकतात. प्रश्न असा आहे की त्या अजूनही आपले ऐकतात की नाही, हे कोणी तपासण्यापूर्वी आपण त्यांना किती अधिकार सोपवलेले असतील. या बाबतीत आपण बेजबाबदार वृत्तीचा परिचय देऊ शकत नाही.
(@प्रोजेक्ट सिंडिकेट)
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



