तेलंगण सरकारच्या कृषीविषयक तज्ज्ञ समितीने मंगळवारी एका प्रस्तावावर चर्चा केली. हा प्रस्ताव देशभरातील शेतकऱ्यांचे जीवन सुकर करू शकतो. ही संकल्पना सध्या नियोजनाच्या पातळीवर असली, तरी ती प्रत्यक्षात आणण्याच्या पद्धतींवर झालेल्या दोन बैठकांमुळे शेतकऱ्यांत मोठी आशा निर्माण झाली आहे. तेलंगण सरकार 20.5 लाख शालेय व इंटरमीडिएट विद्यार्थ्यांच्या अल्पोपाहार योजनेसाठी शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला खरेदी करण्याची योजना आखत आहे. यासाठी रोज सुमारे 1.2 लाख किलो भाजीपाल्याची गरज भासणार आहे. प्रस्तावित व्यवस्थेनुसार विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवणाऱ्या व पुरवणाऱ्या 39 सेंट्रलाइज्ड किचनच्या आसपास राहणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकार लक्ष केंद्रित करेल. कृषी आणि फलोत्पादन अधिकारी या स्वयंपाकघरांच्या आसपासचे भाजीपाला उत्पादक आणि भाजीपाल्याची शेती करण्यास उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची ओळख पटवतील. या उपक्रमाचा मुख्य उद्देश थेट खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक निश्चित बाजारपेठ मिळवून देणे, मध्यस्थांची भूमिका कमी करणे आणि शेतकऱ्यांना योग्य व स्थिर दर मिळवून देणे हा आहे. अतिरिक्त रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी भाजीपाला शेती व पुरवठ्यामध्ये ग्रामीण महिला गटांना सामील करून घेण्यावरही चर्चा केली. प्रस्तावित मॉडेलमध्ये शेतकरी, महिला गट, अन्न पुरवणाऱ्या संस्था व विद्यार्थी यांच्यातील थेट साखळीमुळे सर्वांचाच फायदा होणे अपेक्षित आहे. यामुळे शेतकऱ्यांना विश्वासार्ह बाजारपेठ, महिला गटांना उपजीविकेच्या संधी, संस्थांना कच्च्या मालाचा नियमित पुरवठा आणि शालेय विद्यार्थ्यांना ताजा भाजीपाला मिळू शकेल. कृषी आणि फलोत्पादन विभाग 17 ते 20 ऑगस्टदरम्यान सेंट्रलाइज्ड किचनच्या आसपासच्या परिसराची फील्ड व्हिजिट करेल. यादरम्यान शेतकरी, उपलब्ध भाजीपाला, सिंचन सुविधा आणि इतर गरजांचा अंदाज घेतला जाईल. अधिकारी बियाणे, कृषी तंत्रज्ञान, सरकारी योजना, अनुदान, खरेदी व्यवस्था, संभाव्य दर आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक इतर मदतीचा तपशील गोळा करतील. या उपक्रमामुळे इंदूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नोव्हेंबर 2025 मध्ये आलेल्या एका प्रस्तावाची आठवण होते. त्यात सामूहिक शेतीची सविस्तर योजना दिली होती. ‘नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग’ या शीर्षकाच्या या प्रस्तावात शेतकऱ्यांसाठी योग्य दरात आणि दीर्घ मुदतीच्या लीजवर 220 एकर जमीन मागण्यात आली होती. या जमिनीवर शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि बीएसएफ केंद्रांसारख्या ठिकाणी खरेदी केला जाणार होता, जिथे किचन आणि मेस चालवले जातात. एकूण जमिनीपैकी 200 एकर जमिनीवर भाजीपाल्याची शेती केली जाणार होती तर एका एकरावर शहराच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या आणि वाहतूक कोंडी करणाऱ्या गाईंसाठी निवारा उभारला जाणार होता. निरोगी गाईंचा इतर कामांसाठी उपयोग केला जाऊ शकतो, तर त्यांच्या शेणापासून 200 एकर जमिनीसाठी खत तयार करता येईल. या गाईंच्या चाऱ्यासाठी उरलेल्या जमिनीपैकी नऊ एकरांवर गवत उगवून गाईंना चरण्याची व्यवस्था केली जाईल. या दुभत्या गाई नसल्याने त्यांच्या गुजाऱ्यासाठी केवळ गवत पुरेसे ठरेल, असे प्रस्तावात म्हटले होते. प्रस्तावानुसार उर्वरित 10 एकर जमिनीपैकी एक एकर जागा ट्रॅक्टरसारख्या उपकरणांमध्ये आणि इतर सुविधांमध्ये गुंतवणूक करू शकेल, अशा लोकांसाठी ठेवली जावी. ही उपकरणे जमिनी लीजवर घेणाऱ्या शेतकऱ्यांना भाड्याने देता येतील. कृषी पदवी पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रात येणारे तरुण अशा क्लस्टर्समध्ये प्रशिक्षण घेऊ शकतात. देशभरात चालणाऱ्या दूध संघांच्या धर्तीवर सरकारी यंत्रणांद्वारे अशा क्लस्टर्सच्या 100 टक्के उत्पादनाची खरेदी करण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते. फंडा असा आहे की, अशा संकल्पना शेतकऱ्यांना विश्वासार्ह बाजारपेठ देतात. ग्रामीण महिला गटांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतात व अनेक कलेक्टिव्ह किचन व मेससाठी ताज्या भाजीपाल्याची नियमित पुरवठा साखळी निश्चित करतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




