नुकताच मी एका मुलाखत प्रक्रियेत सहभागी झालो होतो. तेथे मला दिवसभरात 24 उमेदवारांचे स्क्रीनिंग करायचे होते, पण एका गोष्टीचे मला नवल वाटले. कंपनीच्या एचआर टीमने 2 हजारांपेक्षा जास्त अर्जांमधून केवळ दोन डझन उमेदवारांची निवड केली होती. तीही अवघ्या अर्ध्या दिवसात! मी या निवडीच्या पद्धतीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी मला नऊ एआय मॉडेल्समधील सुमारे 13 हजार वेगवेगळे ‘टेल्स’ दाखवले. तुम्ही विचार करत असाल की हे ‘टेल’ नेमके काय आहे? तर ‘टेल’ म्हणजे एखाद्या लिखाणातील काही सूक्ष्म संकेत असतात. त्यावरून ते साहित्य कसे तयार केले गेले हे स्पष्ट होते. उदाहरणार्थ- आपण एखाद्या व्यक्तीची बोलण्याची शैली, हावभाव, बनावटपणावरून त्याला ओळखू शकतो. नोकरी अर्जात वारंवार वापरलेले शब्द, वाक्यप्रचार, रचना यांवरून तो मजकूर एआयने तयार केला की नाही हे सहज समजते. थोडक्यात ‘टेल्स’ हे छोटे संकेत असतात. त्यांच्या मदतीने एआयने लिहिलेला व मानवाने लिहिलेला मजकूर यांतील फरक कळू शकतो. सामान्यपणे ‘टेल’ हे एक भाषिक फिचर आहे. त्याचा वापर मानवी लिखाणाच्या तुलनेत एआयने लिहिलेल्या मजकुरात किमान दुपटीने जास्त होतो. नुकताच अमेरिकेतील ‘ग्रेफाइट’ या संशोधन संस्थेने एआयने तयार केलेल्या 10 हजार लेखांचा अभ्यास केला. या संशोधनात त्यांनी नऊ एआय मॉडेल्समध्ये सुमारे 13 हजार वेगवेगळ्या ‘टेल्स’ ची ओळख पटवली. मग तुम्ही अर्जासाठी एआयची मदत घेतली आहे की नाही, हे ते कसे ओळखतात? समजा, तुम्ही तुमच्या सीव्हीमध्ये एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून देताना ‘व्हाय इट मॅटर’, ‘मॅटर्स मोस्ट’ किंवा ‘जस्ट ॲज इम्पॉर्टंट’ यांसारख्या शब्दांचा एकापेक्षा जास्त वेळा वापर केला, तर त्याबद्दल संशय निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक उमेदवार बोलताना ‘नॉट ओन्ली अबाऊट’, ‘इन्स्टीड इट’ किंवा ‘रॅदर दॅन सिम्पली’ यांसारख्या विरोधी वाक्यरचनांचा वापर कधीच करत नाहीत. पण हा सतर्कतेचा इशारा आहे. मानवी लिखाणातही असे शब्द येऊ शकतात. ग्रेफाइटचे निष्कर्ष हे मोठ्या मजकूर संग्रहातील सांख्यिकी फरक दाखवतात. परंतु हा पूर्ण विश्वासार्ह मार्ग नाही. एचआर प्रोफेशनल्सनुसार 5 गोष्टी महत्त्वाच्या 1. ओळखीचा अभाव असलेली जेनेरिक भाषा : तुमचा अर्ज अतिशय व्यावसायिक वाटू शकतो, पण त्याच वेळी तो इतका सामान्य असतो की तो कोणीही, कोणत्याही नोकरीच्या अर्जासाठी वापरू शकेल. उदाहरणार्थ- “मी एक अत्यंत प्रेरित, परिणामांवर लक्ष केंद्रित करणारा आणि उत्कृष्टतेची आवड असलेला व्यावसायिक आहे.’
2. ठोस पुराव्यांविना केलेले मोठे दावे : उमेदवार स्वतःला नवनिर्मितीक्षम, संघटित, परिस्थितीशी जुळवून घेणारा आणि उत्तम संवादक असल्याचे सांगतो; परंतु त्यासाठी स्वतःच्या कोणत्याही विशिष्ट कामगिरीचा किंवा उदाहरणाचा उल्लेख करत नाही. उदाहरणार्थ, मी सतत उत्कृष्ट निकाल देतो. संस्थेच्या वाढीत योगदान करतो.
3. आवश्यकता नसताना पॉलिश केलेली शैली : अर्जातील प्रत्येक परिच्छेद एका ठराविक साच्यात बसवलेला असतो. वाक्यांत सहज जोडणी असते. ती संतुलित व कॉर्पोरेटमधील ओळखीचे शब्द असतात. त्यामुळे अर्ज वैयक्तिक मत वाटत नाही. उदाहरणार्थ- त्यात ‘फर्दर-मोअर’, ‘मोर-ओवर’, ‘इन-ॲडिशन’, ‘अल्टिमेटली’ यांसारख्या शब्दांचा भरणा असतो.
4. जाहिरातीशी जुळणारे शब्द : उमेदवार जाहिरातीतील मुख्य शब्द, योग्यतेची वारंवार पुनरावृत्ती करतो; परंतु अनुभव कसा जुळतो, हे मात्र सांगत नाही. उदा. एखाद्या जाहिरातीत नेतृत्व, संवादकौशल्य, समस्या निवारण व टीमवर्क या गोष्टी मागितल्या असतील तर अर्जात या चारही गुणांचा दावा केला जातो; पण याबद्दल पुरावे नसतात.
5. अर्ज आणि इतर लिखाणातील तफावत : कव्हरिंग लेटरमधील भाषा प्रभावी, व्याकरणदृष्ट्या निर्दोष असते; मात्र सीव्ही, पूर्वीचा ई-मेल व्यवहार किंवा इतर लिखाणाच्या नमुन्यांतील शैली यात फरक दिसून येतो. उमेदवाराची शब्दसंपत्ती, वाक्यरचनेत फरक दिसतो. तेव्हा एचआरला संशय येऊ लागतो. “मी एक अत्यंत प्रेरित व रिझल्ट-ओरिएंटेड व्यावसायिक आहे, अशी वाक्ये टाळावीत. फंडा असा आहे की, मुलाखत घेणाऱ्यावर केवळ छाप पाडण्यासाठी लिहू नका. पाठांतर केलेल्या उत्तरांऐवजी स्वतःच्या शब्दांत अनुभव सांगा आणि त्याला ठोस उदाहरणांची जोड द्या. मूळ उत्तरे कदाचित परिपूर्ण नसतील आणि एचआरलाही हे चांगलेच माहीत असते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
























Subscribe to my channel




