एन. रघुरामन यांचा कॉलम:मुलाखतीत तुम्ही ‘एआय’ सारखे वाटणार नाही याची दक्षता कशी घ्याल?

नुकताच मी एका मुलाखत प्रक्रियेत सहभागी झालो होतो. तेथे मला दिवसभरात 24 उमेदवारांचे स्क्रीनिंग करायचे होते, पण एका गोष्टीचे मला नवल वाटले. कंपनीच्या एचआर टीमने 2 हजारांपेक्षा जास्त अर्जांमधून केवळ दोन डझन उमेदवारांची निवड केली होती. तीही अवघ्या अर्ध्या दिवसात! मी या निवडीच्या पद्धतीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी मला नऊ एआय मॉडेल्समधील सुमारे 13 हजार वेगवेगळे ‘टेल्स’ दाखवले. तुम्ही विचार करत असाल की हे ‘टेल’ नेमके काय आहे? तर ‘टेल’ म्हणजे एखाद्या लिखाणातील काही सूक्ष्म संकेत असतात. त्यावरून ते साहित्य कसे तयार केले गेले हे स्पष्ट होते. उदाहरणार्थ- आपण एखाद्या व्यक्तीची बोलण्याची शैली, हावभाव, बनावटपणावरून त्याला ओळखू शकतो. नोकरी अर्जात वारंवार वापरलेले शब्द, वाक्यप्रचार, रचना यांवरून तो मजकूर एआयने तयार केला की नाही हे सहज समजते. थोडक्यात ‘टेल्स’ हे छोटे संकेत असतात. त्यांच्या मदतीने एआयने लिहिलेला व मानवाने लिहिलेला मजकूर यांतील फरक कळू शकतो. सामान्यपणे ‘टेल’ हे एक भाषिक फिचर आहे. त्याचा वापर मानवी लिखाणाच्या तुलनेत एआयने लिहिलेल्या मजकुरात किमान दुपटीने जास्त होतो. नुकताच अमेरिकेतील ‘ग्रेफाइट’ या संशोधन संस्थेने एआयने तयार केलेल्या 10 हजार लेखांचा अभ्यास केला. या संशोधनात त्यांनी नऊ एआय मॉडेल्समध्ये सुमारे 13 हजार वेगवेगळ्या ‘टेल्स’ ची ओळख पटवली. मग तुम्ही अर्जासाठी एआयची मदत घेतली आहे की नाही, हे ते कसे ओळखतात? समजा, तुम्ही तुमच्या सीव्हीमध्ये एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून देताना ‘व्हाय इट मॅटर’, ‘मॅटर्स मोस्ट’ किंवा ‘जस्ट ॲज इम्पॉर्टंट’ यांसारख्या शब्दांचा एकापेक्षा जास्त वेळा वापर केला, तर त्याबद्दल संशय निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक उमेदवार बोलताना ‘नॉट ओन्ली अबाऊट’, ‘इन्स्टीड इट’ किंवा ‘रॅदर दॅन सिम्पली’ यांसारख्या विरोधी वाक्यरचनांचा वापर कधीच करत नाहीत. पण हा सतर्कतेचा इशारा आहे. मानवी लिखाणातही असे शब्द येऊ शकतात. ग्रेफाइटचे निष्कर्ष हे मोठ्या मजकूर संग्रहातील सांख्यिकी फरक दाखवतात. परंतु हा पूर्ण विश्वासार्ह मार्ग नाही. एचआर प्रोफेशनल्सनुसार 5 गोष्टी महत्त्वाच्या 1. ओळखीचा अभाव असलेली जेनेरिक भाषा : तुमचा अर्ज अतिशय व्यावसायिक वाटू शकतो, पण त्याच वेळी तो इतका सामान्य असतो की तो कोणीही, कोणत्याही नोकरीच्या अर्जासाठी वापरू शकेल. उदाहरणार्थ- “मी एक अत्यंत प्रेरित, परिणामांवर लक्ष केंद्रित करणारा आणि उत्कृष्टतेची आवड असलेला व्यावसायिक आहे.’ 2. ठोस पुराव्यांविना केलेले मोठे दावे : उमेदवार स्वतःला नवनिर्मितीक्षम, संघटित, परिस्थितीशी जुळवून घेणारा आणि उत्तम संवादक असल्याचे सांगतो; परंतु त्यासाठी स्वतःच्या कोणत्याही विशिष्ट कामगिरीचा किंवा उदाहरणाचा उल्लेख करत नाही. उदाहरणार्थ, मी सतत उत्कृष्ट निकाल देतो. संस्थेच्या वाढीत योगदान करतो. 3. आवश्यकता नसताना पॉलिश केलेली शैली : अर्जातील प्रत्येक परिच्छेद एका ठराविक साच्यात बसवलेला असतो. वाक्यांत सहज जोडणी असते. ती संतुलित व कॉर्पोरेटमधील ओळखीचे शब्द असतात. त्यामुळे अर्ज वैयक्तिक मत वाटत नाही. उदाहरणार्थ- त्यात ‘फर्दर-मोअर’, ‘मोर-ओवर’, ‘इन-ॲडिशन’, ‘अल्टिमेटली’ यांसारख्या शब्दांचा भरणा असतो. 4. जाहिरातीशी जुळणारे शब्द : उमेदवार जाहिरातीतील मुख्य शब्द, योग्यतेची वारंवार पुनरावृत्ती करतो; परंतु अनुभव कसा जुळतो, हे मात्र सांगत नाही. उदा. एखाद्या जाहिरातीत नेतृत्व, संवादकौशल्य, समस्या निवारण व टीमवर्क या गोष्टी मागितल्या असतील तर अर्जात या चारही गुणांचा दावा केला जातो; पण याबद्दल पुरावे नसतात. 5. अर्ज आणि इतर लिखाणातील तफावत : कव्हरिंग लेटरमधील भाषा प्रभावी, व्याकरणदृष्ट्या निर्दोष असते; मात्र सीव्ही, पूर्वीचा ई-मेल व्यवहार किंवा इतर लिखाणाच्या नमुन्यांतील शैली यात फरक दिसून येतो. उमेदवाराची शब्दसंपत्ती, वाक्यरचनेत फरक दिसतो. तेव्हा एचआरला संशय येऊ लागतो. “मी एक अत्यंत प्रेरित व रिझल्ट-ओरिएंटेड व्यावसायिक आहे, अशी वाक्ये टाळावीत. फंडा असा आहे की, मुलाखत घेणाऱ्यावर केवळ छाप पाडण्यासाठी लिहू नका. पाठांतर केलेल्या उत्तरांऐवजी स्वतःच्या शब्दांत अनुभव सांगा आणि त्याला ठोस उदाहरणांची जोड द्या. मूळ उत्तरे कदाचित परिपूर्ण नसतील आणि एचआरलाही हे चांगलेच माहीत असते.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *