रविवारच्या एका शांत सकाळची कल्पना करा. आकाशात ढग दाटून आले आहेत, खिडकीवर हलकीशी पावसाची सर पडत आहे आणि हवामान अगदी आल्हाददायक आहे. कोणतीही घाई नाही, तयार होण्याचे कोणतेही दडपण नाही आणि ऑफिसलाही जायचे नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शांतपणे बसला आहात- एका हातात चहा, दुसऱ्या हातात सकाळचे वर्तमानपत्र. तेवढ्यात थंड हवेची एक झुळूक तुमच्या गालाला स्पर्श करते आणि तुम्ही दोघेही डोळे मिटून घेता. कोणत्याही पूर्वनियोजनाविना तुम्ही एका पूर्ण शांततेच्या अवस्थेत पोहोचता. जग जणू दिसेनासे होते. तुमचा चहा थंड होत आहे, पण तुम्हाला त्याची पर्वा नाही. तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात. जेव्हा शेवटी तुम्ही तुमचे डोळे उघडता तेव्हा तुमच्यापैकी एक जण हळूच म्हणतो, ‘काय उत्तम रविवार आहे’. दुसरा फक्त होकारार्थी मान हलवतो. आपण आपले संपूर्ण आयुष्य नेमक्या याच अनुभूतीच्या शोधात घालवतो. पण तो क्षण इतका परिपूर्ण का होता? असे यासाठी नव्हते की तुमच्या घराचे कर्ज फिटले होते किंवा नुकताच तुमचा पगार बँक खात्यात जमा झाला होता. हे यासाठीही नव्हते की तो वीकेंड होता. तो क्षण यासाठी परिपूर्ण होता. कारण काही निवांत मिनिटांसाठी तुमचे लक्ष केवळ एकाच गोष्टीवर केंद्रित होते- तुमचा श्वास. स्वतःचा वेग मंदावून तुम्ही तुमच्या मेंदूला त्याच्या ‘फाइट-ऑर-फ्लाइट’ मोडमधून बाहेर काढले होते आणि तुमच्या पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टिमला- शरीराच्या स्वाभाविक ‘रेस्ट-अँड-डायजेस्ट’ प्रतिसादाला सक्रिय केले होते. तुम्ही तुमच्या मेंदूला असा संकेत दिला की तुम्ही सुरक्षित आहात, ज्यामुळे वर्षानुवर्षे साचलेला ताण वितळू लागला.याला स्थिरतेचे विज्ञान म्हणतात. त्या काही शांत मिनिटांमध्ये तुमच्या शरीराच्या आत एक अद्भुत जैविक बदल झाला होता. तुमच्या हृदयाची गती मंदावली होती. रक्तदाब कमी झाला होता. तणावाचे प्रमुख संप्रेरक कॉर्टिसोल वेगाने कमी झाले होते. मेंदूचे भावनिक फिअर-सेंटर अमिग्डाला शांत झाले होते, तर तर्कसंगत विचार आणि भावनिक संतुलनावर नियंत्रण ठेवणारा प्री-फ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय झाला होता. आपले पूर्वज ही अवस्था दररोज साधत असत आणि याला ते ध्यान म्हणायचे. आजचे आधुनिक शास्त्रज्ञ याला ‘पीक जेन’ म्हणतात- सखोल रिलॅक्सेशन, मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलनाची सर्वोच्च अवस्था. शेवटी ‘पीक जेन’ किंवा ध्यान म्हणजे काय? हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील भूलतज्ज्ञ प्राध्यापक डॉ. बाला सुब्रमण्यम- ज्यांचे काम प्राचीन ध्यान-विज्ञान आणि आधुनिक वैद्यकशास्त्राची सांगड घालते- याबद्दल सोप्या शब्दांत सांगतात : ‘ध्यानाचे ध्येय अशा अवस्थेत पोहोचणे हे आहे, जिथे तुम्ही तुमच्या विचारांना येता-जाताना पाहता, पण त्यांच्यात अडकत नाही.’ ध्यानाचा अर्थ मनाला जबरदस्तीने रिकामे करणे असा नाही. याचा अर्थ आपल्या मानसिक उलथापालथीमध्ये सहभागी न होता त्याचे तटस्थ साक्षीदार बनणे हा आहे. जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा तुमचे मन मंदावू लागते. यातून एका अशा प्रक्रियेला सुरुवात होते, ज्याला शास्त्रज्ञ ‘टाइम-डायलेशन’ म्हणतात. हे अगदी त्याच ‘फ्लो-स्टेट’सारखे आहे, ज्याचा अनुभव सर्वोच्च स्तरावरील खेळाडू घेतात. विश्वचषकातील जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंची कल्पना करा. चेंडू गोलपोस्टच्या आत पोहोचवण्याआधीच्या एका क्षणी प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियम त्यांच्यासाठी जणू पूर्णपणे अदृश्य होते. गोंधळ संपुष्टात येतो. वेळ जणू विस्तारू लागते. त्यांना बचाव फळीमध्ये एक छोटीशी मोकळी जागा दिसते आणि ते शॉट मारतात. ध्यानदेखील तुम्हाला थेट तशाच हायपर-फोकस्ड स्पष्टतेच्या अवस्थेत घेऊन जाते, जिथे बाह्य जगाचा गोंधळ मंदावतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या आंतरिक प्रज्ञेपर्यंत पोहोचू शकाल. म्हणूनच स्थिरता हा उत्पादकतेचा सर्वात प्रभावी उपाय आहे. मनात सुरू असलेला गोंधळ शांत करण्याचा दैनंदिन सराव मेंदूच्या नैसर्गिक न्यूरोप्लास्टिसिटीचा वापर करत तुमच्या न्यूरल-पाथवेजला पूर्णपणे आनंदासाठी री-वायर करून टाकतो. तुमच्या मनासाठी हे स्मरणशक्ती तीक्ष्ण करते, सखोल एकाग्रता वाढवते आणि रोजच्या निराशेचा सामना करण्यासाठी तुम्हाला मनोवैज्ञानिकदृष्ट्या मजबूत बनवते. तुमच्या शरीरासाठी हे दीर्घकालीन इन्फ्लमेशन कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवते आणि झोपेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणते. फंडा असा आहे की, ध्यान वास्तवात तुमचा वेळ घेत नाही, तर ते तुमच्यासाठी वेळ वाचवते. हे मनात सतत सुरू असणारा गोंधळ शांत करते, ज्यामुळे तुम्ही अधिक सजग, अधिक शांत आणि पूर्णपणे वर्तमानात उपस्थित राहता. दररोज संडेवाली फिलिंग अशीच मिळते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




