गोंडा (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून एक अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाला सरयू नदीच्या पात्रात मगरीने ओढून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीपक शर्मा (वय ३०, रा. ग्रेटर नोएडा) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. अंत्यविधीचे विधी सुरू असताना दीपक नदीत हात धुण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी उतरला असता हा भयानक प्रकार घडला.
सासूच्या निधनानंतर आला होता गावी
मिळालेली माहिती अशी की, ग्रेटर नोएडा येथे राहणारा दीपक शर्मा हा गोंडा जिल्ह्यातील उमरी गावात आपल्या सासूच्या (उर्मिला देवी) निधनाची बातमी ऐकून अंत्यविधीसाठी आला होता. सरयू नदीच्या घाटावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. दीपकने इतर नातेवाईकांसह मिळून अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य आणि खड्डा तयार करण्यास मदत केली. यानंतर तो हात-पाय धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी नदीच्या काठावर गेला.
उपस्थितांनी दिला होता इशारा, पण...
प्रत्यक्षदर्शी राजेश शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीच्या पात्रात मगरींचा वावर असल्याने घाटावर उपस्थित असलेल्या काही स्थानिक गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी दीपकला पाण्यात जास्त पुढे न जाण्याचा आणि सावध राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, दीपकने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि तो नदीच्या पाण्यात उतरला.
तो पाण्यात उतरताच, दबा धरून बसलेल्या एका अजस्त्र मगरीने अचानक त्याच्यावर झडप घातली. हा हल्ला इतका वेगवान आणि भीषण होता की मगरीने थेट दीपकचे डोकं आपल्या जबड्यात पकडले आणि काही सेकंदांतच त्याला खोल पाण्यात ओढून नेले.
शोधमोहीम सुरू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
हा प्रकार पाहताच घाटावर उपस्थित असलेल्या लोकांनी एकच आरडाओरडा केला. स्थानिक नावाडी आणि गावकऱ्यांनी तातडीने नदीच्या पात्रात शोधमोहीम सुरू केली, मात्र दीपकचा कुठेही पत्ता लागला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेचे गांभीर्य ओळखून लखनौवरून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) विशेष पथक पाचारण करण्यात आले आहे. सासूच्या निधनाच्या दुःखात असलेल्या कुटुंबावर जावयाला मगरीने ओढून नेल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



