इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने रौद्र रूप धारण केले आहे. यामुळे सध्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यपूर्व आशियातील सर्वच विमानतळावर अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक भारतीय नागरिक हे परदेशात अडकले आहेत. भारत सरकार त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच काल भारत सरकार आणि एमिरेट्स (Emirates) विमान कंपनीच्या समन्वयाने एका विशेष विमानाचे आयोजन करण्यात आले. हे विशेष विमान आज पहाटे ३ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यानंतर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत भारत सरकारचे आभार मानले आहेत. यानंतर एका प्रवाशाने दुबईत नेमकी कशी परिस्थिती होती याबद्दलची माहिती दिली.
नेमकं काय घडलं?
इराण आणि इस्रायलमधील युद्धाने रौद्र रूप धारण केल्यामुळे मध्यपूर्वेतील आकाश सध्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या आवाजाने हादरले आहे. याच युद्धाचा थेट फटका दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला. दोन दिवसांपूर्वी दुबई विमानतळाच्या परिसरात झालेल्या हल्ल्यामुळे मोठी भीती पसरली होती. दुबई विमानतळावर धुराचे साम्राज्य होते. सर्वत्र काळा धूर पसरला होता. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली. यामध्ये भारताच्या विविध शहरांत जाणारे शेकडो प्रवासी विमानतळावरच अडकून पडले होते.
स्विमिंग पूलमध्ये जाण्यासही मनाई
मर्चंट नेव्हीमध्ये रुजू होण्यासाठी निघालेल्या अजय सिंग यांच्यासाठी हा प्रवास एका दुख:द स्वप्नासारखा ठरला. मी दुबई विमानतळावर कनेक्टिंग फ्लाईटची प्रतीक्षा करत होते. त्याचवेळी हा हल्ला झाला. अचानक एक मोठा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण विमानतळ धुराने भरून गेले. यानंतर विमानतळावर घबराट पसरली. काही लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. आम्हाला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तिथे इतके कडक निर्बंध होते की आम्हाला हॉटेलच्या खोलीबाहेर पडण्यास, अगदी स्विमिंग पूलमध्ये जाण्यासही मनाई होती, असे अजय सिंग यांनी सांगितले.
अनेकांकडून जमिनीला स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त
आम्ही रात्रभर ज्या हॉटेलमध्ये होतो, तिथे फक्त स्फोटांचे आणि विमानांचे आवाज येत होते. आम्ही घरी परतण्याची आशा सोडली होती. हॉटेलमध्ये अनेक थकलेले प्रवासी जेव्हा इफ्तारची तयारी करत होते, तेव्हाच अचानक घोषणा झाली की, भारतीयांसाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एमिरेट्स विमान कंपनीने पुढाकार घेत या प्रवाशांसाठी तातडीने उड्डाण आयोजित केले, असेही त्यांनी म्हटले.
ही घोषणा होताच प्रत्येक भारतीय व्यक्तींनी एकही क्षण वाया न घालवता आपले सामान गोळा केले आणि विमानतळाकडे धाव घेतली. आज पहाटे ३ वाजता जेव्हा हे विशेष विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले, तेव्हा प्रत्येक प्रवाशांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. विमानातून बाहेर पडताच अनेकांनी जमिनीला स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त केली. मी तिथे जे पाहिले ते भयानक होते, पण आता आपल्या देशाच्या मातीवर पाऊल ठेवताच सर्व भीती नाहीशी झाली आहे. आता आम्ही सुरक्षित आहोत, अशी भावना अजय सिंग यांनी व्यक्त केली.
[embedded content]
शहर
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र
- हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- सातारा: कराडला 'ऑक्टोबर हीट'चा प्रचंड तडाखा! वाढत्या उकाड्याने नागरिक घामाघूम, तर कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ थंडावली
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
गुन्हा
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान






















Subscribe to my channel


