गेल्या काही महिन्यांपासून जागतिक व्यापारात मोठी उलथापालथ पहायला मिळाली आहे. याच काळात भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारदेखील झाला आहे. अशातच आता हा करार एप्रिल 2026 मध्ये अंमलात येण्याची अपेक्षा आहे. या कराराला व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) असे म्हटले जाते. या कराराच्या अंमलबजावणीमुळे दोन्ही देशांमधील व्यापार खूपच सोपा होणार असून सर्वसामान्य भारतीयांना याचा मोठा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारत आणि ब्रिटनने 24 जुलै 2025 रोजी व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) वर स्वाक्षरी केलेली आहे. या करारानुसार 99 % भारतीय उत्पादने कोणत्याही शुल्काशिवाय ब्रिटनमध्ये पाठवता येणार आहेत. तर ब्रिटनमधून कार आणि व्हिस्की आयात करताना त्यावर खूप कमी शुल्क लागणार आहे. आता एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा करार एप्रिलमध्ये अंमलात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना स्वस्तात कार आणि व्हिस्की खरेदी करता येणार आहे.
ब्रिटिश संसदेची मान्यता आवश्यक
दोन्ही देशांमधील करार अंमलात येण्यापूर्वी तो ब्रिटिश संसदेची मान्यता मिळणे गरजेचे आहे. भारतात, केंद्रीय मंत्रिमंडळ अशा करारांना मान्यता देते, तर ब्रिटनमध्ये यासाठी ब्रिटिश संसदेची मान्यता आवश्यक आहे. त्यानंतर असे करार अंमलात येतात. ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या आठवड्याच्या सुरुवातीला भारत-यूके सीईटीएवर चर्चा झाली आहे. आता लवकरच याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य
CETA कराराचे लक्ष्य 2030 पर्यंत जगातील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार दुप्पट करून 56 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवणे हे आहे. या करारांतर्गत, भारताने चॉकलेट, बिस्किटे आणि सौंदर्यप्रसाधने यासारख्या विविध वस्तूंसाठी ब्रिटनमधील बाजारपेठ खुली होणार आहे. तसेच कापड, पादत्राणे, रत्ने आणि दागिने, क्रीडा वस्तू आणि खेळणी यासह अनेक उत्पादनांवर शून्य टक्के कर लागणार आहे. त्यामुळे सर्वांना फायदा होणार आहे.
दारू स्वस्त होणार
CETA करारानुसार, स्कॉच व्हिस्कीवरील शुल्क 150 टक्क्यांवरून 75 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. त्यानंतर हेच शुल्क 2035 पर्यंत 40 टक्क्यांपर्यंत कमी केले जाण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईल्सवरील आयात शुल्क आगामी पाच वर्षांत सध्याच्या 110 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहे. त्यामुळे कारही स्वस्त होणार आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



