सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:सरकार अन् लष्करातील समन्वय‎प्रत्येक देशासाठी आवश्यक आहे

‎‎‎‎‎‎‎‎‘आपण युद्धामुळे हरलो!’ मध्यावधी निवडणुकीतील‎पराभवानंतर जेडी व्हॅन्स यांनी हे विधान केले. त्यांच्या या‎वक्तव्यामुळे ट्रम्प प्रशासनाने इराणबाबत निर्णय कसे घेतले‎यावर विचार करण्याची संधी मिळाली आहे. संरक्षणमंत्री‎हेगसेथ यांच्या कार्यकाळात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना‎पदावरून हटवण्यात आले. तसेच लष्करी नेतृत्वावर‎जाहीर टीकाही झाली. यातून असा प्रश्न निर्माण होतो की,‎लष्करी कमांडर युद्धामागच्या गृहीतकांना उघडपणे‎आव्हान देत होते का? की हे युद्ध आपले उद्दिष्ट साध्य‎करण्यात अपयशी ठरत असल्याचा इशारा ते देत होते?‎ काश्मीर आणि नियंत्रण रेषेवर प्रचंड अस्थिरता‎असताना मी कोअर कमांडर होतो. त्या काळात मी‎बहुतेक वेळ मुख्यालयाबाहेर घालवत असे. माझ्या‎अधिकाऱ्यांसोबत आमच्या बैठका होत तेव्हा प्रत्येकाला‎कोणत्याही योजनेवर प्रश्न विचारण्याची किंवा माझ्या ‎‎आकलनाला आव्हान देण्याची पूर्ण मुभा होती. प्रत्यक्ष ‎‎जमिनीवर काय घडू शकते असे त्यांना वाटते, हे मला‎ऐकायचे असायचे. विशेषतः जिथे त्यांचे मत माझ्यापेक्षा‎वेगळे असेल तिथे मी अधिक लक्ष देत असे. यामुळे‎आम्हाला असे धोके ओळखण्यास मदत झाली, ज्यांकडे‎इतर वेळी दुर्लक्ष झाले असते. या मोकळेपणाशिवाय माझे ‎‎अनेक निर्णय तितके प्रभावी ठरले नसते.‎ 1971 मधील भारताच्या अनुभवानेही दाखवून दिले की, ‎‎राष्ट्रीय स्तरावरही ही पद्धत प्रभावी ठरते. तत्कालीन‎लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी सांगितले होते‎की, पावसाळा, सैनिकांची हालचाल आणि तयारीसाठी‎लागणारा वेळ यांचा लष्करी मोहिमांवर परिणाम होईल.‎इंदिरा गांधींच्या सरकारने या सल्ल्याचा गांभीर्याने विचार‎केला. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सरकारकडेच‎होता. तयारीसाठी मिळालेल्या वेळामुळे भारताला‎आपल्या लष्करी संसाधनांचा प्रभावी वापर करता आला.‎ एखादा राजकारणी जनरलच्या गृहीतकांवर प्रश्न‎उपस्थित करू शकतो. जनरल सरकारच्या एखाद्या‎पावलाशी संबंधित धोके समजावून सांगू शकतो. परंतु,‎त्यानंतर दोघेही पुन्हा चर्चेच्या टेबलावर बसून आपले काम‎पुढे नेऊ शकतात. अशा नात्याचा पाया विश्वास असतो.‎विशेषतः निर्णय वेगाने घ्यायचे असतात आणि उपलब्ध‎माहिती अपूर्ण असते तेव्हा हा विश्वास महत्त्वाचा ठरतो.‎ कारगिल युद्धातूनही एक धडा मिळतो. 1999 मध्ये‎परवेझ मुशर्रफ आणि काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी‎नियंत्रण रेषेपलीकडे घुसखोरीची योजना आखली होती.‎सुरुवातीला बहुतांश वरिष्ठ लष्करी कमांडरांना या‎चर्चेपासून दूर ठेवण्यात आले. उंच शिखरांवर ताबा कसा‎मिळवायचा, हे योजना आखणाऱ्यांना माहीत होते. पण‎त्याहूनही कठीण प्रश्न वेगळे होते. भारताने पूर्ण ताकदीने‎प्रत्युत्तर दिल्यानंतर त्या शिखरांवर ताबा कसा टिकवून‎ठेवायचा? आणि योजना फसल्यास त्यांचे सैन्य तिथून‎मागे कसे हटणार? विश्वासू सल्लागारांत यावर व्यापक‎चर्चा झाली असती तर सैनिकांनी नियंत्रण रेषा‎ओलांडण्यापूर्वीच योजनेतील त्रुटी समोर आल्या असत्या.‎ सप्टेंबर 2026 पर्यंत ‘सीबीसी न्यूज’ने अशा किमान 20‎वरिष्ठ लष्करी आणि नागरी संरक्षण अधिकाऱ्यांची यादी‎प्रसिद्ध केली होती, ज्यांनी हेगसेथ यांनी पदभार‎स्वीकारल्यानंतर आपली पदे सोडली होती. यामध्ये‎बडतर्फी, दबावाखाली घेतलेला राजीनामा आणि स्वेच्छेने‎पद सोडणे-अशा तिन्ही प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये‎लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांचाही समावेश होता.‎एप्रिल 2026 मध्ये हेगसेथ यांनी त्यांना निवृत्त होण्यास‎सांगितले होते. त्या वेळी इराणशी युद्ध सुरू होते. या‎अधिकाऱ्यांच्या जाण्याचा ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या‎सल्ल्यावर नेमका काय परिणाम झाला हे पेंटागॉनच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎बाहेरून समजणे कठीण आहे. मात्र, ज्याने कधीकाळी‎लष्करी नेतृत्व केले आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला या‎धोक्याची पूर्ण जाणीव असते. एखाद्या योजनेत गंभीर त्रुटी‎दिसणारा अधिकारी ती सांगण्यास कचरू शकतो.‎दुसरीकडे, सैनिकांना मोहिमेवर पाठवल्यानंतर जर‎कमांडरला ती त्रुटी लक्षात आली तर रणनीती बदलणे‎कठीण होते. यामध्ये सैनिकांचे प्राणही जाऊ शकतात.‎ अखेरीस ट्रम्प यांनीही मान्य केले की, युद्धामुळे‎निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नुकसान झाले. परंतु, युद्ध‎लढण्याबाबत त्यांना जो सल्ला दिला गेला त्याची‎जबाबदारी हेगसेथ यांची होती. युद्धाचे समर्थन करताना‎हेगसेथ यांनी जाहीरपणे काय म्हटले हे आपल्याला माहीत‎आहे. पण त्यांनी खासगीत काय सल्ला दिला होता याची‎माहिती फारशी उपलब्ध नाही. एखाद्या लष्करी कमांडरला‎असे वाटत असेल की, पुढील हल्ल्यांमुळे देशाची स्थिती‎आणखी बिघडू शकते तर हे आकलन नेत्यापर्यंत स्पष्टपणे‎पोहोचले पाहिजे. आणि त्यासाठीची सर्वात योग्य वेळ‎म्हणजे हल्ल्याचे आदेश देण्यापूर्वीचीच असते.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ राजकारणी लष्कराच्या गृहीतकांवर प्रश्न‎उपस्थित करू शकतात. लष्कर सरकारच्या‎निर्णयांशी संबंधित धोके सांगू शकते. पण‎त्यानंतर दोघांनाही पुन्हा चर्चेच्या टेबलावर‎परतून काम पुढे न्यावे लागते. अशा‎नात्याचा पाया विश्वास असतो.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *