
Pune : व्हॉट्सअॅप स्टेटसवर आत्महत्या करण्याबाबत भावनिक संदेश आणि मुलीचा फोटो पोस्ट करुन बेपत्ता झालेल्या पोलिसाच्या बाबतीत मोठी अपडेट समोर आली आहे. यवत पोलिस ठाण्या अंतर्गत केडगाव पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलिस नाईक निखिल रणदिवे अचानक बेपत्ता झाल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती. तब्बल पाच दिवस बेपत्ता राहिल्यानंतर रणदिवे काल मध्यरात्री सुखरुप घरी परतले. त्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलले नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
निखिल रणदिवे यांनी स्टेटसमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या वागणुकीबाबत गंभीर आरोप केले होते. गेल्या वर्षभरापासून वरिष्ठांचा सततचा मानसिक छळ, मनमानी आदेश, वारंवार दूरस्थ ठिकाणी ड्युटी, आजारी मुलीला वेळ न देता येणे आणि नुकत्याच झालेल्या शिक्रापूर बदलीतील रिलीव्हिंगमध्ये झालेला विलंब यामुळे प्रचंड तणावात असल्याचे त्यांनी स्टेटसवर लिहिले होते.
या पोस्टनंतर त्यांचा मोबाईल बंद झाला आणि ते बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यवत, शिक्रापूर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली होती.
|
|
निखिल रणदिवे काल मध्यरात्री सुखरुप घरी परतल्याची माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी दिली. रणदिवे परतल्याने पोलिस दल व कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र मानसिक तणाव आणि वरिष्ठांविरुद्धचे आरोप यावर आता पोलिस दलाकडून स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता आहे.
पीआय नारायण देशमुख यांच्याविरुद्ध यापूर्वीही काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या कारभाराबाबत ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. आता याबाबत काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शहर
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- वर्धा: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात निलंबित विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ
- पुणे: लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भीषण आग; ७ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल, मोठी दुर्घटना टळली
- कोल्हापुर: बिबट्याची दहशत! फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर उसाच्या शेतात शिरला बिबट्या, थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!





























Subscribe to my channel



