गेल्या काही दिवसांत ‘अग्निपथ'' योजनेत जो बदलकरण्यात आला, त्यासाठी तुम्ही मुत्सद्दी स्वरूपाचे किंवाराजकीयदृष्ट्या सोयीचे कोणतेही विशेषण वापरू शकता,परंतु एकंदरीत याला आपल्या योजनेतून मागे हटणेच म्हटलेजाईल. मूळ योजनेनुसार, पहिल्या तुकडीतील 75 टक्केअग्निवीर चार वर्षे सेवा बजावल्यानंतर डिसेंबरपर्यंतआपापल्या घरी परतले असते. कोणी यूपीमध्ये गेले असते,कोणी उत्तराखंड, तर कोणी पंजाब किंवा मणिपूरमध्येपरतले असते, जिथे फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणारआहेत. या राज्यांमधून सैन्यात जास्त जवान भरती होतात.बेरोजगार झालेले हे सैनिक परत येऊन विरोधकांच्यारॅलींमध्ये सहभागी झाले असते किंवा कॉक्रोच जनता पार्टीतसामील झाले असते. हा धोका पत्करण्यासारखा मानलागेला नाही. पुढच्या वर्षी नोव्हेंबरच्या सुमारास हिमाचलआणि गुजरातमध्येही निवडणुका होणार आहेत.हिमाचलमध्ये भाजपचा गेल्या वेळी पराभव झाला होता.हिमाचलमध्ये माजी सैनिकांची मोठी लोकसंख्या आहे,आणि तिथून सैन्यात भरतीही खूप मोठ्या प्रमाणात होते.सरकारे तीन गोष्टींसाठी ओळखली जातात. एक चौथीगोष्टही आहे : सरकारे चांगली पावले तर उचलतात, परंतुदबावाखाली ती मागेही घेतात. पहिली दोन पावले चांगलीकिंवा वाईट असतात. तिसरे, चांगले पाऊल त्या प्रस्तावितकरतात, परंतु ते लागू करण्याची हिंमत किंवा कौशल्यत्यांच्यात नसते. याचे उदाहरण म्हणून आपण यूपीएसरकारच्या अनेक निर्णयांची गणना करू शकतो. ‘आधार''आणि त्यावर आधारित ‘इंडिया स्टॅक'', जनकल्याण अंतर्गत‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर'' (डीबीटी) आणि केवळगरीब तसेच पात्रता असणाऱ्यांनाच सवलतीच्या दरातस्वयंपाकाचा गॅस थेट पोहोचवण्याच्या योजनेचेच उदाहरणघ्या. यूपीए सरकारने पायाभूत सुविधांच्या राष्ट्रीयमहत्त्वाच्या ज्या भव्य आणि धाडसी प्रकल्पांचे प्रस्तावमांडले होते, त्यांनाही उदाहरण म्हणून घेतले जाऊ शकते. तेसर्व एक तर अनिर्णयाच्या जाळ्यात अडकून पडले किंवापक्ष विरुद्ध सरकार यांच्यातील अंतर्गत द्वंद्व किंवा वैचारिकविरोधामुळे रेंगाळले. त्यापैकी बहुतांश प्रकल्प नंतर मोदीसरकारने पूर्ण केले. जसे की श्रीनगरपर्यंत रेल्वे, मुंबई मेट्रो,मुंबईचा ट्रान्स हार्बर लिंक, अनेक नवे द्रुतगती मार्ग(एक्सप्रेस-वे), रेल्वेचा ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर'' किंवासशस्त्र माओवादाचा पोतडीतून शेवट—हे सर्व यूपीएचेप्रकल्प होते. पत्रकारितेत आम्ही लोक ‘तीन उदाहरणांचा''नियम घेऊन चालतो. सरकारने जी ‘पावले मागे घेतली'',त्यात कृषी कायद्यांचे उदाहरण घेतले जाऊ शकते, जे 2020मध्ये आणले गेले आणि शेतकऱ्यांच्या विरोधामुळे 2021मध्ये मागे घेतले गेले. दुसरी ‘माघार'' ही अग्निवीर योजनाआहे. तिसऱ्यासाठी मी जातीय जनगणनेचे नाव घेईन.सरकार नेहमीच याच्या विरोधात राहिले आहे, पण आतायाचा 2021 च्या जनगणनेत समावेश करण्यात आला आहे.हे राहुल गांधींच्या दबावामुळे करण्यात आले आहे. जरतुम्हाला वाटत असेल की हे तिसरे उदाहरण देण्यासारखेनाही, तर मी आणखी एक उदाहरण देऊ शकतो. मोफतसुविधांना ‘रेवडी संस्कृती'' म्हणून त्यांची निंदा केली जातहोती. जुलै 2022 मध्ये, यूपीच्या जालौनमध्ये बुंदेलखंडएक्सप्रेस-वेचे उद्घाटन करताना असे म्हटले गेले होतेकी—रेवडी संस्कृती देशाच्या विकासासाठी धोकादायकआहे. रेवडी संस्कृती चालवणारे लोक नवे एक्सप्रेस-वे,विमानतळ, सुरक्षा कॉरिडॉर कधीही बनवणार नाहीत.आपल्याला या विचाराचा पराभव करायचा आहे. परंतु 2023मध्ये छत्तीसगड निवडणुकीदरम्यान कोविड महामारीच्याकाळात मोफत धान्य देण्याची योजना सुरू ठेवण्याचीघोषणा करण्यात आली. त्याच काळात ‘लाडकी बहीणयोजना''ही आणली गेली. यानंतर तर ‘रेवडी क्रांतीच''आली आणि रोख रकमेच्या वाटपाची मर्यादा बिहारमध्येएकरकमी 10,000 रुपयांपर्यंत पोहोचवली गेली. एखादाउद्योग सुरू करणाऱ्या महिलेला 2 लाखांपर्यंत देण्याचेआश्वासन दिले गेले. आज महाराष्ट्रासारख्या श्रीमंतराज्यासाठीही अशा प्रकारचे वाटप करणे कठीण ठरत आहेआणि ते लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा विचार करतआहेत. कृषी कायद्यांपासून ते अग्निपथपर्यंतच्या संदर्भाततुम्ही म्हणू शकता की सरकार ‘जय जवान, जय किसान'' याभावनेला कसोटीवर उतरवू शकले नाही. लोक आपल्याआयुष्यावर खोलवर परिणाम करणाऱ्या मोठ्या धोरणात्मकबदलांकडे एकंदरीत संशयानेच पाहतात, विशेषतः जेव्हा हेबदल दडपशाहीच्या किंवा दबावाच्या रूपात मांडले जातात.नोटबंदी किंवा कोविडमधील टाळेबंदीच्या(लॉकडाउनच्या) निर्णयांची आठवण करा. शेतकरी आणिसैनिकांवर परिणाम करणारे निर्णयही असेच घेण्यात आले.राज्यकारभार करणे हे कंटाळवाणे आणि कष्टाचे कामआहे, कारण यासाठी खूप तयारी करावी लागते, परिस्थितीसमजून घ्यावी लागते, बुद्धिबळाच्या चाली रचाव्यालागतात, किंवा सैन्य दलातील लोक ज्याला ‘स्टाफ वर्क''म्हणतात—ते करावे लागते. नागरी सेवा, नोकरशाहीयाचसाठी आहे. याच्या कमतरतेने योजनांवर परिणाम केलाआहे. प्रश्न असा आहे की अधिकाऱ्यांना तयारी करण्याससांगितले गेले होते का? की निर्णय घेऊन त्यांच्यावरसोपवण्यात आला? निर्णय विश्लेषणाचा बळी ठरूशकतात अशी भीती वाटली असेल. परंतु तुम्ही नेहमीचअशा कमांडोसारखे काम करू शकत नाही, जो पॅराशूटचीतपासणी न करताच उडी मारतो. अग्निपथ योजना जेव्हालागू केली गेली, तेव्हाच सर्वांना माहीत होते की याचीपहिली तुकडी या राज्यांतील निवडणुकांच्या सुमारास यायोजनेतून बाहेर पडेल. त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळातचत्यांच्या व्यापक पुनर्वसनाच्या कार्यक्रमाद्वारे हा धक्काटाळता आला असता. आता तर व्याजासह मुद्दलही गेलेआहे. अग्निपथ योजनेतील वाईट ‘स्टाफ वर्क''मुळे दोनप्रकारचे सैनिक तयार झाले, दोन प्रकारचे वेतन-भत्ते आणियुद्धात शहीद होणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांसाठी दोन प्रकारचेलाभ निश्चित झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सैन्यदलांमध्येही सैनिक आता कमी कालावधीसाठी नियुक्तहोतात. अनिवार्य भरती असलेल्या या सैनिकांना पूर्णवेळसैनिकांपेक्षा वेगळ्या श्रेणीत ठेवले जात नाही. पण इथे त्यांनावेगळ्या नावाने ओळखले जाते. प्रत्येक युनिटमध्येअग्निवीरांची सब-युनिट असायची. हे सर्व चालू शकणारनव्हते. पेंन्शनचा बोजा कमी करणे आणि सैन्याला तरुणकरणे त्याचे सरासरी वय 32 वरून कमी करून 24-26करण्याचे विचार चांगले होते. परंतु चुकीचे नियोजन,घाईघाईत अंमलबजावणी करणे, त्यांना मागे घेणे यामुळेदोन्ही विचार गुंडाळले गेले आहेत. आता पहिली तुकडीआपली सहा वर्षे 2029 मध्ये पूर्ण करेल, जेव्हा सार्वत्रिकनिवडणुका होतील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) स्टाफ-वर्कची कमतरता नसावीपेन्शनचा बोजा कमी करणे, सैन्याला तरुणकरणे त्याचे सरासरी वय 32 वरून कमीकरून 24-26 करण्याचा विचार चांगलाहोता. परंतु चुकीचे नियोजन, घाईत अंमलबजावणी करणे, त्यांना मागे घेणे यामुळेदोन्ही विचार गुंडाळले. सैन्यदलातील लोकज्याला ‘स्टाफ वर्क'' म्हणतात त्याचीकमतरता प्रशासनात दिसून येते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

श्रीनगरमध्ये भीषण आग; बटमालूमधील दोन घरे आगीत जळून खाक
शरद पवारांच्या राजकीय हालचालींबाबत मोठा खुलासा; प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण!
मुंबईत NSG आणि भारतीय वायुदलाची संयुक्त मॉक ड्रिल; सुरक्षा यंत्रणांकडून आपत्कालीन परिस्थितीचा सराव!
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




