पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:ईश्वराला मनुष्य प्रिय आहे, कारण‎ मनुष्यात देवत्वाची शक्यता आहे

ईश्वर भक्तांशी संवाद साधताना अनेक गूढ गोष्टी सांगतो. गीतेमध्ये अनेकदा असे पाहायला मिळाले आहे. रामचरितमानसमध्येही श्रीरामांनी लक्ष्मण आणि भरताशी बोलताना अनेक गोपनीय तथ्ये उलगडली आहेत. श्रीराम काकभुशुंडीजींना एक अत्यंत व्यक्तिगत सिद्धांत सांगतात-‘सब मम प्रिय सब मम उपजाए, सबते अधिक मनुज मोहि भाए.’ राम म्हणतात, ‘मी तुला माझा हा खासगी सिद्धांत सांगतो. तसे तर सर्वच मला प्रिय आहेत, कारण ते सर्व माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत; पण मनुष्य मला सर्वाधिक आवडतो.’ आपल्याला मनुष्यदेह मिळाला आहे आणि आपण सर्वजण देवाला खूप आवडतो. मग आपण ईश्वराप्रति कृतज्ञता म्हणून अशा काही गोष्टी करतो का? मनुष्याकडे पर्याय निवडण्याची सर्वात मोठी संधी आहे. पण जेव्हा काय निवडावे अशी वेळ येते तेव्हा आपण शुभ गोष्टी टाळतो आणि अशुभ स्वीकारतो. तरीही ईश्वर म्हणतो, ‘मला मनुष्य यासाठी आवडतो, कारण मी त्याच्या आत देवत्वाची शक्यता ठेवली आहे.’ आता मनुष्याने हवे तर याचा उपयोग करावा किंवा दुरुपयोग.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *